Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckPoliticsगुजरातमधील आम आदमी पार्टीच्या रॅली संबंधितचा द न्यूयॉर्क टाइम्सचा खोटा स्क्रिनशॉट होतोय...

गुजरातमधील आम आदमी पार्टीच्या रॅली संबंधितचा द न्यूयॉर्क टाइम्सचा खोटा स्क्रिनशॉट होतोय व्हायरल

आम आदमी पार्टीच्या गुजरात रॅली संबंधित आंतरराष्ट्रीय माध्यम समूह ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चा एक तथाकथित स्क्रिनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉटमुळे द न्यूयॉर्क टाइम्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

स्क्रिनशॉटमध्ये इंग्रजीत लिहिलंय की, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या एका रॅलीत सर्वात जास्त लोक एकत्र आल्याचा विक्रम झाला आहे. यानुसार गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीत २५ कोटी लोकं सामील झाले. त्याचबरोबर त्या फोटोत रस्त्यावर लोकांची खूप गर्दी दिसून येत आहे. 

सोशल मीडियावरील युजर्सचे म्हणणे आहे की, ६.५ कोटी लोकसंख्या असलेल्या गुजरातमध्ये २५ कोटी लोकं रॅलीत कसे काय सामील होऊ शकतात ? स्क्रिनशॉटला खरा आहे, असं मानून लोकं द न्यूयॉर्क टाइम्सवर चुकीची बातमी छापल्याचा आरोप करत आहे. 

युजर्सचे असे म्हणणे आहे की, द न्यूयॉर्क टाइम्सने चुकीचे आकडे दाखवून आम आदमी पार्टीच्या बाजूने बातमी चालवत आहे. शेकडो लोकांनी फेसबुक आणि ट्विटरवर हा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

ट्विटरचा स्क्रिनशॉट

(या ट्विटची संग्रहित लिंक इथे पाहू शकता)

फेसबुकचा स्क्रिनशॉट

गेल्या शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक रोड शो केला होता. 

गुजरातमध्ये या वर्षाअखेर निवडणूक होण्याची शक्यता आहे. पंजाबप्रमाणेच आम आदमी पार्टी गुजरातमध्ये देखील जिंकण्यासाठी प्रयत्न करत होती. यामुळे त्यांनी आताच प्रचार करायला सुरवात केली. त्यातच आता हा द न्यूयॉर्क टाइम्सचा खोटा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.

Fact Check / Verification

सर्वात प्रथम आम्ही तपासले की, द न्यूयॉर्क टाइम्सने ही बातमी छापली आहे की नाही. गुगल अ‌ॅडव्हान्स सर्चच्या मदतीने आम्ही ही तथाकथित बातमी वेगवेगळ्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीची कोणतीच बातमी आम्हांला मिळाली नाही. ही बातमी संग्रहित केलेली देखील आम्हांला कुठे आढळली नाही. 

त्यानंतर आम्ही व्हायरल स्क्रिनशॉटची तुलना द न्यूयॉर्क टाइम्स संकेतस्थळाशी केली. आम्ही त्यांची नीट तुलना करून पाहिली. दोन्हीमध्ये वेगवेगळे फॉन्ट वापरले आहे. व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये ‘लाईव्ह’च्या शेजारी काहीच दिसत नाही. पण द न्यूयॉर्क टाइम्सच्या संकेतस्थळावर ‘लाईव्ह’ सोबत रशिया-युक्रेन युद्ध आणि पाकिस्तान असे दोन विभाग दिसत आहे. 

व्हायरल स्क्रिनशॉट आणि द न्यूयॉर्क टाइम्स संकेतस्थळ यांच्या स्क्रिनशॉटची केलेली तुलना

याबाबत आम्ही शोधल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, पत्रकार राणा अय्यूब यांनी व्हायरल स्क्रिनशॉट संबंधित एक ट्विट केले होते. 

त्यांनी लिहिले होते की, हा स्क्रिनशॉट खोटा आहे. कारण द न्यूयॉर्क टाइम्स आणि अन्य आंतरराष्ट्रीय माध्यम समूह अशा पद्धतीने बातमीत ‘crore’ असं लिहीत नाही. जसे त्या व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये लिहिलेले दिसत आहे. 

राणा यांच्या ट्विटला द न्यूयॉर्क टाइम्सने अधिकृतरित्या ट्विटरवर ३ एप्रिल २०२२ रोजी उत्तर दिले. त्या उत्तरात द न्यूयॉर्क टाइम्सने याचा नकार देत सांगितले की, आम्ही अशी कुठलीही बातमी छापलेली नाही. 

व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये जो फोटो दिसत आहे, तो फोटो अहमदाबादमध्ये झालेल्या आम आदमी पार्टीच्या रॅलीतील आहे. हा फोटो खुद्द भगवंत मान यांनी ट्विट केला होता. 

हे वाचू शकता : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी खरंच अटक केली? जाणून घ्या सत्य काय आहे

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, आम आदमी पार्टीच्या गुजरात रॅली संबंधितचा द न्यूयॉर्क टाइम्सचा स्क्रिनशॉट व्हायरल झालाय, तो खोटा आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने अशी कोणतीही बातमी छापलेली नाही. 

Result : Fabricated News / False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular