Authors
Claim
वांद्रे बॅंडस्टँड येथे दोघांचा बुडून मृत्यू.
Fact
ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर एक महाराष्ट्रीय माणूस आणि त्याची दोन मुले जोरदार लाटांनी वाहून गेल्याचा व्हिडिओ 2022 चा असल्याचे आढळून आले.
अनेक सोशल मीडिया युजर्स मुंबईतील मुसळधार पावसात वांद्रे (Bandra) बँडस्टँडवर दोन जण बुडाल्याचा दावा करत समुद्रकिनाऱ्यावर लाटांनी वाहून गेल्याचा व्हिडिओ शेअर करत आहेत. संततधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते बंद, रेल्वे रद्द आणि शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत, हवामान खात्याने ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 20 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तसेच मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहता येतील.
Fact Check
Newschecker ने “Bandra bandstand two drowning” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला अशा घटनेच्या कोणत्याही विश्वसनीय बातम्यांकडे नेले नाही. तथापि, आम्हाला अनेक बातम्यांचे रिपोर्ट मिळाले , ज्यात 9 जून रोजी वांद्रे किल्ल्याजवळील बँडस्टँड येथे एका 27 वर्षीय महिला पतीसोबत फोटो काढताना वाहून गेल्याचे येथे, येथे आणि येथे दिसून आले. व्हिडिओंची तुलना केल्यास हे सिद्ध झाले की व्हायरल क्लिप या घटनेची नाही.
न्यूजचेकरच्या लक्षात आले की व्हायरल व्हिडिओंच्या टिप्पण्यांमधील अनेक युजर्सनी ही घटना ओमानमध्ये घडल्याचे निदर्शनास आणले. यातून एक संकेत घेऊन, आम्ही “Oman beach drowning”, हा कीवर्ड शोधला, ज्यामुळे आम्हाला 14 जुलै 2022 च्या NDTV च्या रिपोर्टकडे नेले, ज्यामध्ये महाराष्ट्रातील एक माणूस आणि त्याचा सहा वर्षांचा मुलगा ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर खेळत असताना बुडाले असे लिहिल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
“दुसऱ्या पर्यटकाने घेतलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये श्रुती आणि श्रेयस पाण्यात खेळत असताना जोरदार लाटेत वाहून गेल्याचे दाखवले आहे. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे वडील तात्काळ पाण्यात त्यांचा पाठलाग करून गेले, पण तेही बुडाले,”
रिपोर्टमध्ये वापरलेला स्क्रीनशॉट आणि व्हायरल व्हिडिओची तुलना ही त्याच घटनेची पुष्टी करते. व्हिडिओ शेअर करणाऱ्या तत्सम बातम्या इथे, इथे आणि इथे पाहता येतील.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात एक माणूस आणि त्याची दोन मुले ओमानमधील समुद्रकिनाऱ्यावर जोरदार लाटांमध्ये वाहून गेल्याचे दिसत असलेला 2022 चा व्हिडिओ, मुंबईच्या पावसादरम्यान वांद्रे बँडस्टँडमधील अलीकडील घटना म्हणून शेअर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Sources
NDTV report, July 14, 2022
News18 report, July 14, 2022
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम कुशल एच. एम. यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in