Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkतुर्कस्तानचा भूकंप: ढिगाऱ्याशेजारी बसलेल्या कुत्र्याचा 2018 मधील फोटो होतोय व्हायरल

तुर्कस्तानचा भूकंप: ढिगाऱ्याशेजारी बसलेल्या कुत्र्याचा 2018 मधील फोटो होतोय व्हायरल

Claim

तुर्कस्तानच्या नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर आपला मालक ढिगाऱ्याखाली अडकल्याने शेजारी बसलेल्या कुत्र्याचे चित्र असे सांगत एक भावनिक फोटो व्हायरल होतोय.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्ती शेजारी बसलेल्या कुत्र्याचा फोटो अलीकडील तुर्की भूकंपातला आहे.
@domdyer70‘s tweet

Fact Check/Verification

ढिगाऱ्यात अडकलेल्या माणसाच्या शेजारी बसलेल्या कुत्र्याच्या फोटोवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला अमेरिकन केनेल क्लबने 2021 मध्ये पोस्ट केलेल्या लेखाकडे नेले. शोध आणि बचाव मोहिमेतील कुत्रे पीडित लोकांना कसे शोधतात याबद्दल लेख सांगतो.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्ती शेजारी बसलेल्या कुत्र्याचा फोटो अलीकडील तुर्की भूकंपातला आहे.
 Screen shot of the article in the website American Kennel Club

हे छायाचित्र 2019 मध्ये IStockphoto च्या पेजवर देखील अपलोड करण्यात आले होते.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्ती शेजारी बसलेल्या कुत्र्याचा फोटो अलीकडील तुर्की भूकंपातला आहे.
Description of the image on iStock website

आणखी एक लोकप्रिय स्टॉक फोटो वेबसाइट Alamy.com जी लोकांना प्रतिमा खरेदी करण्याची संधी देते. तेथे देखील हेच छायाचित्र उपलब्ध होते. अलामीच्या म्हणण्यानुसार, ही प्रतिमा जारोस्लाव नोस्का नावाच्या व्यक्तीने ऑक्टोबर 2018 मध्ये काढली होती. मात्र, चित्राचे लोकेशन मात्र याठिकाणी दिलेले नाही.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्ती शेजारी बसलेल्या कुत्र्याचा फोटो अलीकडील तुर्की भूकंपातला आहे.
Description of the image on Alamy website

जारोस्लाव नोस्का हा झेक छायाचित्रकार आहे आणि त्याचे ट्विटर पृष्ठ सूचित करते की त्याचा फोकस पोट्रेट आहे.

ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्ती शेजारी बसलेल्या कुत्र्याचा फोटो अलीकडील तुर्की भूकंपातला आहे.
Courtesy: Twitter@fotonoska

याशिवाय, अलामीवर चित्रित केलेल्या छायाचित्राला कॅप्शन दिले आहे “भूकंपानंतर उध्वस्त झालेल्या जखमींना शोधत असलेला कुत्रा. मथळे आमच्या योगदानकर्त्यांद्वारे प्रदान केले जातात. ”

त्यामुळे, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्यक्तीकडे पाहात कुत्रा बसलेला दाखविणारा व्हायरल फोटो अलीकडील तुर्की भूकंपाशी खोटेपणाने जोडला जात आहे.

Result: False

Sources

Article From, AKC, Dated October 18, 2021

IStockPhoto from January 4, 2019  

Alamy.com photo from October 18, 2018

तुम्हाला हे आवडले असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर इथे क्लिक करा.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular