Monday, December 23, 2024
Monday, December 23, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: तुर्कीचा भूकंप ते भारताचे संसद भवन, मोदी पदवीधर आहेत की...

Weekly Wrap: तुर्कीचा भूकंप ते भारताचे संसद भवन, मोदी पदवीधर आहेत की नाहीत पाहुयात या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

तुर्कस्तान येथे झालेल्या भूकंपाने सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट चा पाऊस पडला. संसदेत मोदींच्या भाषणावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाळ्या वाजविणे टाळले असा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. मोदी पदवीधर नाहीत म्हणून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचा फोटो वापरला नाही असे स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

ही इमारत तुर्कस्तानमध्ये कोसळली? तुर्कीचा भूकंप सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट चा पाऊस पडला.

तुर्कीचा भूकंप: ही इमारत तुर्कस्तानमध्ये कोसळली?

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात एक इमारत कोसळल्याचा दावा करून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. आमच्या तपासात हा व्हिडीओ फ्लोरिडा येथील असल्याचे उघडकीस आले.

ढिगाऱ्याशेजारी बसलेला कुत्र्याचा फोटो कधीचा?

ढिगाऱ्याशेजारी बसलेला कुत्र्याचा फोटो कधीचा?

तुर्कस्तान येथील भूकंपानंतर गाडल्या गेलेल्या एक मालकाशेजारी त्याचे कुत्रे बसले आहे असा दावा करीत एक फोटो व्हायरल करण्यात आला, आमच्या तपासात हा फोटो तुर्कस्तानमधील नसून जुना असल्याचे स्पष्ट झाले.

मोदींबद्दल फडणवीस असे म्हणाले नाहीत

मोदींबद्दल फडणवीस असे म्हणाले नाहीत

महाराष्ट्रात झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराला मोदींचा फोटो वापरला नाही कारण ते पदवीधर नाहीत. असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.

गडकरींनी टाळ्या वाजविणे टाळले?

गडकरींनी टाळ्या वाजविणे टाळले?

संसदेत मोदींच्या भाषणावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाळ्या वाजविणे टाळल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा व्हिडीओ एडिट करून खोटेपणाने करण्यात आल्याचे उघड झाले.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

1 COMMENT

Most Popular