Monday, April 21, 2025

Fact Check

अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी घातल्याच्या नावाखाली पाकिस्तानचा व्हिडिओ व्हायरल 

banner_image

अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी घातल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सैनिक मोबाईलचा ढिग पायाखाली तुडवत असल्याचे दिसत आहे. तालिबाननी मोबाईल वापरणा-यांना मृत्युदंडाची शिक्षा देणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी
फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

फेसबुक पोस्ट इथे पहा.

हा दावा आम्हाला युट्यूबवर देखील आढळून आला.

मराठीसह हिंदी आणि ऑइतर भाषांमध्येही हा दावा व्हायरल होत आहे.

खरं तर, ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्यापासून तेथे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अलीकडेच तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगाणिस्तानात केवळ हिजाब परिधान करणाऱ्या महिलांनाच शिक्षण आणि नोकरीचा अधिकार मिळेल. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तान मानवतावादी आपत्तीत बुडाला आहे आणि पश्चिमेतील अनेक देशांनी अफगाणिस्तानला मिळणारी आंतरराष्ट्रीय मदत थांबवली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की, ‘अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी, नवीन कायदा आणला आहे’.

Fact check/Verification 

‘अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी’ अशा दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही इनव्हीड टूलच्या मदतीने त्याचे काही की-फ्रेममध्ये रूपांतर केले. कीफ्रेमसह Google Image Reverse साहाय्याने शोध घेतला. या दरम्यान आम्हाला 1 जानेवारी 2022 रोजी Muhammad Fayyaz vlogs नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ प्राप्त झाला. व्हिडिओनुसार पाकिस्तानच्या कराची प्रांतात सीमाशुल्क विभागाने कारवाई केली. व्हायरल व्हिडिओचा काही भाग Muhammad Fayyaz vlogs नावाच्या YouTube चॅनेलवरून मिळवलेल्या व्हिडिओमध्ये दिसतो.

Screenshot of Google Reverse Image
creenshot of Muhammad Fayyaz vlogs Youtube Channel

आमच्या अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी च्या संदर्भात तपासादरम्यान, आम्ही ‘Custom Destroy Good’ कीवर्डच्या मदतीने Google वर शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला 30 डिसेंबर 2021 रोजी The International News वेबसाइटने प्रकाशित केलेला अहवाल प्राप्त झाला. वृत्तानुसार, सीमाशुल्क (अंमलबजावणी) कराचीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी लाखो रुपयांच्या अमली पदार्थ, दारू, गुटखा, ड्रग्ज आणि सुपारी यासह तस्करी आणि प्रतिबंधित वस्तू नष्ट करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Screenshot of The International News Report

तपासादरम्यान, आम्ही अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी संदर्भात काही कीवर्डच्या मदतीने यूट्यूबवर शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला Daily City News नावाच्या YouTube चॅनेलद्वारे 29 डिसेंबर 2021 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ प्राप्त झाला. व्हिडिओत म्हटले आहे की, “पाकिस्तानमधील कराचीमधील सीमा शुल्क विभाग मोठ्या प्रमाणात तस्करी आणि प्रतिबंधित वस्तू नष्ट करताना.” Daily City News ने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये, व्हायरल व्हिडिओचा एक भाग 21 व्या सेकंदात पाहिला जाऊ शकतो.

Screenshot of The Daily City News Youtube Channel

Read More : कर्नाटकात तिरंगा काढून भगवा फडकवण्यात आला? चुकीचा दावा व्हायरल 

Conclusion

 अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत असे स्पष्ट झाले की, ‘अफगाणिस्तानमध्ये मोबाईलवर बंदी , अफगाणिस्तानात नवा कायदा आला आहे’, असा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ अफगाणिस्तानचा नसून पाकिस्तानचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ डिसेंबर 2021 मधील असून पाकिस्तानमधील सीमाशुल्क विभागाने प्रतिबंधित वस्तू नष्ट करण्याचे आदेश दिले होते.

Result: Misleading/ Partly false

Our Sources

Youtube

The International News

The Daily City News

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,843

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage