Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact CheckViralहिंदुंना शिव्या देणा-या एनसीपीच्या अरबाज खानच्या मारहाणीचा नाही व्हायरल व्हिडिओ, जाणून घ्या...

हिंदुंना शिव्या देणा-या एनसीपीच्या अरबाज खानच्या मारहाणीचा नाही व्हायरल व्हिडिओ, जाणून घ्या सत्य

Authors

हिंदुंना शिव्या देणा-या एनसीपीच्या अरबाज खानच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जमावाने काही गाड्याचीं तोडफोड केली आहे शिवाय एका व्यक्तिला बेदम मारहाण करण्यात येत आहे असे या व्हिडिओत दिसते दावा करण्यात येत आहे की काही दिवसांपूर्वी हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या नागपुरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचा शहर कार्यकारी अध्यक्ष अरबाज खानला नागपुरातील जनतेने असा हिसका दाखवला आहे.

ट्विटर संग्रहित

फेसबुकवर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ याच दाव्याने व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/nareshshenoym/videos/462331588085025

Fact Checking/Verification

नागपुरातील राष्ट्रवादीच्या अरबाज खान नावाच्या कार्यकर्त्याने खरंच हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते का आणि त्याला नागपुरातील जनतेने धडा शिकविला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या शोधा दरम्यान inpx.in या वेबसाईटवर राष्ट्रवादीच्या अरबाज खान याच्या विरुद्ध श्रीराम सेनेने हिंगणा पोलिस ठाण्यात निवेदन दिले असल्याची बातमी आढळून आली.

पण आम्हाला अरबाज खानला मारहाण झाल्याची बातमी आढळून आली नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आह याचा शोध घेण्यास सुरुवात केली. व्ह्डिओतील काही किफ्रेम्स गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला एका ट्विटमध्ये सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आढळून आला. 21 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर कऱण्यात आलेला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की,हा व्हिडिओ सांचोली गावातील असल्याचे सांगितले जात आहे. जो सोहना जवळ आहे. गुरुग्रामवरुन काही लोक गाड्यामंधून सांचोली गावात आले शस्त्राच्या धाकाने जमिन ताब्यात घेऊ लागले असता सरंपचांनी विरोध केला पण त्यांना सरपंचावर फायरिंग केले.

https://twitter.com/Fardeenjubair/status/1340868297550544897

अधिक शोध घेतला असता आम्हाला दैनिक भास्करची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, सांचोली गावात एका फार्महाऊसच्या जमीनीवरुन खूप वर्षापासून वाद सुरु आहे. अशातच एक महिला गुरुग्रामवरुन काही बाउंसर सह तेथे पोहचली व भांडणे सुरु केली यात माजी सरपंच इम्तियाज यांना गोळी लागली.

याशिवाय या घटनेचा व्हिडिओ आम्हाला न्यूज 18 च्या युटयूब चॅनलवर देखील आढळून आला.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ नागपुरमधील राष्ट्रवादीच्या अरबाज खान याच्या मारहणीचा नसून हरियाणामधील जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार व मारहाणीचा आहे.

Result:  Misleading

Our Sources

News18- https://www.youtube.com/watch?v=AR33QlF0SDA

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular