Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact CheckViralव्हायरल होणारा व्हिडिओ खरंच ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील आहे? याचे सत्य जाणून घ्या

व्हायरल होणारा व्हिडिओ खरंच ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील आहे? याचे सत्य जाणून घ्या

(याची मूळ तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली आहे आणि हा लेख Shubham Singh याने लिहिला आहे)

सोशल मीडियावर वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ एका विशिष्ट धर्माशी जोडत दावा केलाय की, ज्ञानवापी सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी मारले. या व्हिडिओत पोलीस लोकांना मारतांना दिसत आहे.

फोटो साभार : Facebook/Sanjay Pandey

ट्विटरवर देखील काही युजरने हा व्हिडिओ ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील पोस्ट समजून शेअर केला आहे.

(या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे जोडत आहे)

मागील काही दिवसांपूर्वी ज्ञानवापी मशिदीत एक सर्वेक्षण झाले. त्यानंतर पुन्हा एकदा काशी विश्वनाथ मंदिर चर्चेत आले. एबीपी माझाच्या बातमीनुसार, ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाच्या संदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

जेव्हा ज्ञानवापी परिसरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास न्यायालयाने मनाई केली होती, त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे. यातच हिंदू पक्षाने दावा केलाय की, हे शिवलिंग आहे. पण मशिदीच्या कमिटीने हा दावा फेटाळत तिथे फक्त एक कारंजे आहे, असे म्हटले.

यातच आता सोशल मीडियावर वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी मारले, असा दावा केला जात आहे.

Fact Check / Verification

ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही इन-विड टूलच्या मदतीने त्यातली एक फ्रेम गुगल रिव्हर्स करून शोधली. त्यावेळी आम्हांला समाजवादी पार्टीच्या ट्विटर खात्यावर जुलै २०२१ चे एक ट्विट सापडले. त्या ट्विटनुसार, युपीतील प्रयागराजमध्ये मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशाने सपाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. म्हणजे हाच व्हिडिओ आता ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील पोस्ट शेअर केली जात आहे.

फोटो साभार : Twitter@samajwadiparty

त्याचबरोबर पडताळणी करत असतांना आम्हांला नवभारत टाइम्सने प्रकाशित केलेली ३ जुलै २०२१ ची एक बातमी सापडली. त्या बातमीनुसार, युपीतील प्रयागराजमध्ये पंचायत निवडणुकी दरम्यान आंदोलन करणाऱ्या सपाच्या नेत्यांना पोलिसांनी काठीने मारले.

युपीतील प्रयागराजमधील जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या मतमोजणीत गडबड झाल्याच्या आरोपावरून समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. नवभारत टाइम्सने तोच व्हिडिओ अपलोड केला होता, जो आता शेअर केला जात आहे. प्रयागराजमध्ये सपाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेमुळे त्यावेळी अन्य काही माध्यम समूहांनी देखील याची बातमी प्रकाशित केली होती. तुम्ही त्या इथे वाचू शकता.

युपीमध्ये मागच्या वर्षी जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या. यात भाजपने ७५ जागांपैकी ६५ जागा जिंकल्या होत्या. पंचायत निवडणुकीबाबत सपाने मतदानात गडबड झाल्याचा आरोप केला होता. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करत योगी सरकारवर टीका करतांना म्हणाले की, बीजेपी पंचायत निवडणुकीत हेराफेरी आणि फसवणूक करत आहे.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडिओचा ज्ञानवापी सर्वेक्षणाच्या संदर्भातील गोष्टीशी कुठलाही संबंध नाही. जेव्हा प्रयागराजमध्ये पंचायत निवडणुकीच्या गडबड झाल्याच्या  विरोधात सपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. त्यावेळीचा हा व्हिडिओ आहे.

Result : False Context/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular