सोशल मीडियावर कानपूरमधील धार्मिक विवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दावा केलाय की, कानपूरमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदोलकांना मारले. असंही बोललं जातंय की, हा व्हिडिओ शुक्रवारी झालेल्या हिंसेचा आहे.

इस्लामच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्यामुळे माजी प्रवक्ता नुपूर शर्मा आणि भाजपचे पदाधिकारी नवीन जिंदल यांना प्राथमिक सदस्य पदावरून काढून टाकण्यात आले, असे भारतीय जनता पार्टीने स्पष्टीकरण दिले. नुपूर शर्मा यांनी ट्विट करून आपले विधान मागे घेण्याबद्दल बोलल्या. पण हा वाद वैश्विक स्तरावर पोहोचल्याने तो थांबण्याचे नाव घेत नाही.
नुपूर शर्मा आणि दिल्लीचे माजी पदाधिकारी नवीन जिंदल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात अनेक ठिकाणी त्याचा विरोध केला जात होता. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या दौऱ्यात भाजपमधील पदाधिकाऱ्यांच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे आंदोलकांनी हिंसक रूप घेतले. त्यानंतर शहरात धार्मिक संघर्षाची आग भडकली.
यातच आता सोशल मीडियावर कानपूरमधील धार्मिक विवादाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात दावा केलाय की, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदोलकांना मारले आणि हा व्हिडिओ शुक्रवारी झालेल्या विवादाचा आहे. याची तथ्य पडताळणी आधी हिंदीत केली आहे. तुम्ही ते इथे वाचू शकता.

Fact Check / Verification
मागील काही दिवसांपूर्वी कानपूर पोलिसांनी आंदोलकांना मारले, कानपूरमधील धार्मिक विवादाचा व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्यातील एक फ्रेम गुगलवर टाकून शोधली. या प्रक्रियेत आम्हांला अन्य काही दाव्यांव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही.

त्यानंतर आम्ही त्यातील एक फ्रेम यांडेक्सवर टाकून शोधली. यात आम्हांला माहिती मिळाली की, कानपूरमधील धार्मिक विवादाचा नावाने शेअर केला जाणारा व्हिडिओ जुना आहे आणि हा वेगवेगळ्या दाव्यांसोबत शेअर केला जात आहे. यांडेक्सवर मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ इंदोरमधील दगडफेकीच्या नावाने सुद्धा शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.

आम्हांला व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या फोटोंच्या आधारे आणि शहरांच्या नावाच्या शेअर केल्या जाणाऱ्या कीवर्डच्या मदतीने शोधले. तेव्हा आम्ही २० मार्च २०२० ते १५ एप्रिल २०२० दरम्यान गुगलवर त्या संदर्भात बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हांला काही अमर उजाला आणि पत्रिकाच्या काही बातम्या मिळाल्या. ज्यात व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे.

९ एप्रिल २०२० रोजी पत्रिकामध्ये छापलेल्या एका लेखात सांगितले की,”दोन गटात झालेल्या मारामारीची घटना महाराष्ट्रातील मुंब्रा जिल्ह्यात २७ मार्च २०२० रोजी घडली होती.” ६ एप्रिल २०२० रोजी अमर उजालात प्रकाशित झालेल्या लेखात सदर व्हिडिओ इंदोर पोलिसांनी केला जाणारा दावा चुकीचा असल्याचे सांगितले.

या विषयावर राजस्थान पत्रिकाने ९ एप्रिल २०२० रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओत हा मुंब्राचा असल्याचे सांगितले आहे.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणी हे स्पष्ट झाले की, मागील काही दिवसांपूर्वी कानपूरमधील धार्मिक विवादाचा व्हिडिओ म्हणून शेअर केला जाणारा दावा भ्रामक आहे. हा व्हिडिओ कानपूरचा नसून तो महाराष्ट्रातील मुंब्रामधील आहे. तसेच हा व्हिडिओ २०२० पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
Result : False Context/False
Our Sources
९ एप्रिल २०२० रोजी पत्रिकाने प्रकाशित केलेली बातमी
६ एप्रिल २०२० रोजी अमर उजालाने प्रकाशित केलेली बातमी
९ एप्रिल २०२० रोजी राजस्थान पत्रिकाने प्रकाशित केलेली बातमी
मार्च आणि एप्रिल २०२० रोजीच्या यु ट्यूब व्हिडिओ
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.