Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckViralकोलकाता पोलीस यात्रेकरूंना लाठीने मारतांनाचा व्हिडिओ आताचा आहे? भ्रामक दावा व्हायरल

कोलकाता पोलीस यात्रेकरूंना लाठीने मारतांनाचा व्हिडिओ आताचा आहे? भ्रामक दावा व्हायरल

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख शुभम सिंह याने लिहिला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जातोय की, पश्चिम बंगालचे पोलीस कंवरियांना मारहाण करत आहे. या व्हिडिओत काही पोलीस अधिकारी मंदिराजवळील काही लोकांना मारत आहे.

ट्विटरवर काही युजर हा व्हिडिओ शेअर करत दावा करत आहे की, पश्चिम बंगाल पोलिसांनी कंवर यात्रेतील भाविकांना मारहाण केली.

फोटो साभार : Twitter@Anandkumar_IND

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

हा व्हिडिओ फेसबुकवर देखील शेअर केला जात आहे.

फोटो साभार : Facebook/page/After Modi, Only Yogi

श्रावण महिन्याबरोबर कंवर यात्रेलाही सुरवात झाली आहे. कंवर यात्रेला गंगेचे पाणी घेऊन ते महादेवाचा जलाभिषेक करण्यासाठी देशाच्या विविध भागातून हरिद्वारला पोहोचतात. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली कावड यात्रा यावेळी सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालचे पोलीस कंवरियांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Fact Check / Verification

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘पश्चिम बंगाल भाविक पोलीस’ हा कीवर्ड ट्विटरवर टाकून शोधला. तेव्हा आम्हांला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरविंद मेनन यांनी १६ ऑगस्ट २०२१ रोजी केलेले ट्विट आढळले, त्यात व्हायरल व्हिडिओ देखील होता. त्यानुसार, कोलकाताच्या भूतनाथ मंदिरात हिंदू भाविकांवर पश्चिम बंगाल पोलीस अत्याचार करत होती. यावरून हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ एक वर्षापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

याच दरम्यान आम्हांला १६ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित झालेली दैनिक जागरणची बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, कोलकातामधील श्रावणच्या शेवटच्या सोमवारी भूतनाथ मंदिरासमोर भाविकांच्या झालेल्या गर्दीला कमी करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. 

दैनिक भास्करची देखील १६ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित झालेली बातमी मिळाली. त्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पश्चिम बंगालमधील जवळपास सर्व मंदिरे उघडण्यात आली होती. सोमवार असल्याने शिवभक्तांची मंदिराबाहेरूनच दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली, त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. अनेक यु ट्यूब वाहिन्यांनी वर्षापूर्वी ही बातमी प्रकाशित केली होती. 

हे देखील वाचू शकता : राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यायचा, असं विधान खरंच संजय राऊत यांनी केलंय? भ्रामक दावा व्हायरल

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, पश्चिम बंगाल पोलिसांनी कंवरियांना मारहाण केल्याचा व्हिडिओ जवळपास एक वर्षापूर्वीचा आहे. ही घटना आताची सांगत चुकीची माहिती पसरवली जात आहे.

Result : Partly False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular