Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
बीएलएने पाकिस्तान आणि चीनला बलुचिस्तानमधून माघार घेण्याची धमकी दिली आणि हल्ला केला.
२०१९ मध्ये पाकिस्तानी हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर बीएलएने दिलेल्या इशाऱ्याचा हा व्हिडीओ आहे.
बीएलएचा पाकिस्तान आणि चीनला धमकी देणारा व्हायरल व्हिडिओ मेसेज असे सांगत एक व्हिडीओ कोलाज व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये इशाऱ्याचा व्हिडीओ मेसेज असून दुसऱ्या व्हिडिओत एक स्फोटाचे दृश्य एकत्रित स्वरूपात दाखविले जात आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आघाडीचे दैनिक सकाळ ने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून “पाकच्या सैनिकांवर हल्ला चढवत बलुच आर्मीचा थेट इशारा, चीनलाही सोडलं नाही” अशा कॅप्शनखाली हा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
कथित व्हिडिओमध्ये, बीएलएचा एक नेता “चीन आणि पाकिस्तानला बलुचिस्तान मधून ताबडतोब माघार घेण्याचा स्पष्ट संदेश” देत असल्याचे दिसत आहे, तसेच, “सीपीईसी (चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर) बलुचिस्तानच्या भूमीवर अत्यंत अपयशी ठरेल.” असे म्हणत तो चिनी अधिकाऱ्यांना धमकी देखील देतो आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना “बलुचिस्तान सोडा अन्यथा बदला घ्या” असे सांगताना दिसतो.
सकाळ माध्यमाने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये आढळलेले दोन्ही व्हिडीओ आम्ही बारकाईने पाहून त्यांच्यावर तपास केला असता, आम्हाला खालील माहिती सापडली.
व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर गुगल लेन्स सर्च केल्यावर आम्हाला @SHussainShokat ची २० मे २०१९ रोजीची X पोस्ट मिळाली. त्यात व्हायरल क्लिपमध्ये दिसत असलेल्या लोकेशनवरच BLA सदस्यांचा व्हिडिओ होता.
आम्ही व्हिडिओ स्कॅन केला आणि तो व्हायरल फुटेजचा एक मोठा व्हर्जन असल्याचे आढळले. क्लिपच्या मोठ्या व्हर्जनच्या सुरुवातीच्या काही फ्रेम्समध्ये, BLA नेता म्हणतो, “आमच्या आत्मत्यागी पथकाने ग्वादरमधील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलवर हल्ला केला आणि पाकिस्तान आणि चीन दोघांचेही मोठे नुकसान केले…”
व्हिडिओच्या मोठ्या व्हर्जनमध्ये तो पुन्हा ४५ सेकंदांच्या आत पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलवरील हल्ल्याचा उल्लेख करतो. तथापि, व्हायरल क्लिपमध्ये हा भाग एडिट करण्यात आला आहे.

आम्हाला १९ मे २०१९ रोजीची एक फेसबुक पोस्ट देखील सापडली ज्यामध्ये हाच व्हिडिओ होता.
व्हायरल क्लिपचा स्क्रीनशॉट घेऊन १९ मे २०१९ रोजी द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, “… बलुच लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडच्या चार सदस्यांनी ग्वादरमधील एका पंचतारांकित हॉटेलवर हल्ला केल्यानंतर आणि पाकिस्तानी कमांडोंशी २६ तास झुंज दिल्यानंतर काही दिवसांतच हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. ११ मे रोजी ग्वादरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील बीजिंगच्या प्रमुख विकास मोहिमेभोवती, ज्यामध्ये एका खोल समुद्री बंदराचा समावेश आहे, सुरक्षा चिंता वाढल्या आहेत.”

मे २०१९ मध्ये ग्वादरमधील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलवर झालेल्या हल्ल्याबद्दल अनेक वृत्तपत्रांनी बातमी दिली असून येथे, येथे आणि येथे वाचता येईल.
आम्ही बीएलए च्या कारवायांसंदर्भात माहिती देणाऱ्या वेबसाईटवर जाऊन पाहणी केली असता अलीकडील काळात इशारा देणारा कोणताही व्हिडीओ आढळला नाही.
यावरून संबंधित व्हिडीओ सहावर्षे जुना असल्याचे स्पष्ट झाले.
दाव्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओत डोंगराळ भागातून एक वाहन जात असताना दिसते आणि अचानक स्फोटके टाकण्यात आल्याचे आणि स्फोट झाल्याचे दिसून येते. आम्ही या व्हिडिओचा तपास करण्यासाठी स्फोटाचे दृश्य असणाऱ्या किफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
आम्हाला इंडिया टुडे ८ मे २०२५ आणि झी न्यूजने १३ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातम्या सापडल्या. यामध्ये संबंधित स्क्रिनशॉट वापरून बलूच लिबरेशन आर्मीने आयईडीचा वापर करत पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर केलेल्या हल्ल्याचे वृत्त वाचायला मिळाले. स्फोटात १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही पाक–बलूच संघर्ष सुरुच आहे.


यावरून व्हिडीओ कॉलेजमधील दुसरा व्हिडीओ अलीकडचा असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे आमच्या तपासात बलुचिस्तान आर्मी चा हल्ला करून पाक आणि चीन आर्मीला इशारा असे सांगणारा दावा चुकीच्या संदर्भाने दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
Sources
X Post By @SHussainShokat on May 20, 2019
Report By The Balochistan Post on May 19, 2019
News published by India Today on May 8, 2025
News published by Zee News on May 13, 2025
Salman
November 29, 2025
Vasudha Beri
November 21, 2025
Prasad S Prabhu
October 27, 2025