Authors
Claim
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बनावट मत दिल्याबद्दल पोलीस अधिकारी बुरखा घातलेल्या मुस्लिम व्यक्तीला पकडत असताना.
Fact
व्हायरल व्हिडिओ जून 2023 चा आहे आणि लाहोर, पाकिस्तानचा आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ प्रसारित करत आहेत, असा दावा करत आहे की त्यात एक पोलीस अधिकारी बुरखा घातलेल्या एका मुस्लिम व्यक्तीला पकडताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी बुरख्याचा वापर करीत होता, असा दावा आहे. युजर्सनी या प्रकरणाला “व्होट जिहाद” चे उदाहरण म्हटले आहे, या शब्दामुळे मंगळवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि त्यांची भाची मारिया आलम यांच्याविरुद्ध “व्होट जिहाद’ची हाक दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी फारुखाबाद लोकसभा जागेवरून इंडिया ब्लॉकच्या उमेदवाराच्या बाजूने हे आवाहन केले होते.
पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मराठी भाषेत मिळाला.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/ Verification
न्यूजचेकरने प्रथम व्हिडिओच्या कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेज शोध चालवला, ज्यामुळे आम्हाला या ट्विटर पोस्टवर नेले, 19 जून 2023 व्हिडीओची स्पष्ट आवृत्ती शेअर केली गेली होती. अशीच एक 18 जून 2023 ची फेसबुक पोस्ट येथे पाहिली जाऊ शकते, यातून पुष्टी मिळते की व्हायरल व्हिडिओ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आहे, तसेच तो पाकिस्तानचा आहे.
आम्ही पाहिले की भिंतीवर (डावीकडे) पोलिस अधिकारी आणि बुरखा घातलेला माणूस यांच्या मागे कॅपिटल सिटी पोलिस लाहोरचा लोगो आहे.
संबंधित कीवर्ड शोधामुळे आम्हाला लाहोर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिनांक 18 जून 2023 रोजी केलेल्या या पोस्टवर नेले, त्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील घटनेची माहिती आहे. यामुळे सदर व्हिडीओ सध्याच्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही याची पुष्टी मिळते.
Conclusion
पोलीस अधिकारी बुरखा घातलेल्या माणसाला पकडतानाचा व्हायरल व्हिडिओ 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील नसून पाकिस्तानचा आहे.
Result: False
Sources
Twitter post, Lahore Police, June 18, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in