Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

HomeFact Checkराम मंदिराच्या विरोधात बोलल्याबद्दल इम्रान खानची इस्लामिक देशांच्या परिषदेतून हकालपट्टी केली?

राम मंदिराच्या विरोधात बोलल्याबद्दल इम्रान खानची इस्लामिक देशांच्या परिषदेतून हकालपट्टी केली?

Authors

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा निषेध केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इस्लामिक देशांच्या परिषदेतून हकालपट्टी केल्याचा दावा करणारा एक व्हायरल संदेश फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

न्यूजचेकरला असे आढळले की हा संदेश जुन्या बातम्यांच्या आधारे तयार करण्यात आला होता, ज्यात म्हटले आहे की, इस्लामिक सहकार्य संघटनेने काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यास पाकिस्तानला नकार दिला आहे.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, UAE आणि मालदीवमधील नेते हिंदूंच्या बाजूने बोलले आणि इम्रान खान यांनी ‘भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल’ निंदा केली.

सौदी अरेबियाच्या राजाने खान यांना परिषदेतून बाहेर पडण्यास सांगितले, ज्याचे सर्व इस्लामिक देशांनी कौतुक केले, असे संदेशात म्हटले आहे.

जवळपास पाचशे शब्दांच्या या मेसेजमध्ये स्रोत म्हणून WION न्यूजच्या लेखाची लिंक आहे आणि वाचकांना ‘पोस्ट शेअर करा’ आणि ‘भारताचा अभिमान पसरवा’ असे आवाहन केले आहे.

Crowd Tangle, एक सोशल मीडिया मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म वापरून, आम्हाला आढळले की हा संदेश Facebook वर जवळपास 50 वेळा शेअर केला गेला आहे आणि 30 नोव्हेंबरपासून शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

CrowdTangle data चा स्क्रिनशाॅट


अनेक ट्विटर युजर्सनी हा व्हायरल मेसेजही शेअर केला आहे.

याव्यतिरिक्त, न्यूजचेकरला WhatsApp हेल्पलाइन नंबरवर (+91 9999499044) मेसेजची सत्यता तपासण्यासाठी विनंती देखील प्राप्त झाली.

Factcheck/Verification

व्हायरल दाव्यात तथ्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही मेसेजमध्ये स्त्रोत म्हणून नमूद केलेली लिंक उघडली असता असे आढळले की ती दिल्लीस्थित इंग्रजी वृत्तवाहिनी WION न्यूजच्या च्या लेखाची लिंक आहे.

Organisation of Islamic Cooperation (OIC) snubs Pakistan on Kashmir again (‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ने काश्मीरवर पुन्हा पाकिस्तानला रोखले) या शीर्षकाच्या लेखात म्हटले आहे की, नायजर प्रजासत्ताकमध्ये झालेल्या ओआयसीच्या 47 व्या वार्षिक परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचे खंडन करण्यात आले.

SWION news’ न्यूजच्या बातमीचा स्क्रिनशाॅट

Organization of Islamic Cooperation ही 57 मुस्लिम देशांची युती आहे जी स्वतःला ‘मुस्लिम जगाचा सामूहिक आवाज’ म्हणून वर्णन करते जे ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्द वाढवण्याच्या भावनेने मुस्लिम जगाच्या हिताचे रक्षण आणि संरक्षण करण्याचा प्रयत्न करते.

26 नोव्हेंबर 2020 च्या WION च्या अहवालात अयोध्या किंवा राम मंदिराचा उल्लेख नाही पण असे म्हटले आहे की, ‘पाकिस्तान काश्मीरवर चर्चेची मागणी करत आहे आणि OIC ने हा मुद्दा मांडावा अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या सदस्यांनी भारताविरुद्धच्या प्रचार मोहिमेत सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती, तथापि, ओआयसीने पाकिस्तानला फटकारले आहे.’’

पुढे, न्यूजचेकरला असे आढळले की, ‘शांतता आणि विकासासाठी दहशतवादाच्या विरोधात संयुक्त’ या परिषदेला व्हायरल दाव्यात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली नव्हती तर OIC देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.

परिषदेसाठी पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी करत होते, पंतप्रधान इम्रान खान नाही.

त्याचप्रमाणे, संयुक्त अरब अमिरातीचे आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री रीम अल-हाशेमी आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद या परिषदेला उपस्थित होते.

त्याचप्रमाणे, सौदी अरेबियाचे प्रतिनिधित्व परराष्ट्र व्यवहार मंत्री फैसल बिन फरहान बिन अब्दुल्ला यांनी केले.

Conclusion

The viral message claiming Minister Imran Khan was expelled from a ‘Conference of Islamic Countries’ for condemning the construction of the Ram Temple in Ayodhya is false. Imran Khan did not represent Pakistan in the said conference and the claim is fabricated.

Result: Fabricated

Our Sources

Report by WION News
Organization of Islamic Cooperation
Tweet by Pakistan’s Ministry of foreign affairs

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, योध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा निषेध केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इस्लामिक देशांच्या परिषदेतून हकालपट्टी केल्याचा दावा करणारा व्हायरल मेसेज खोटा आहे. इम्रान खान यांनी या परिषदेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेले नाही.

Result: Fabricated

Our Sources

Report by WION News
Organization of Islamic Cooperation
Tweet by Pakistan’s Ministry of foreign affairs


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular