Authors
मागील आठवड्यात सोशल मीडियावर अनेक फेक दावे करण्यात आले. सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणण्यात आली ते दर्शविणारा व्हिडीओ आहे, असा दावा करण्यात आला. NDTV पोल ऑफ पोल्सने तेलंगणाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्पष्ट विजय घोषित केला आहे, असा दावा झाला. उत्तराखंडच्या खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका केल्याचे फुटेज असे सांगत एक व्हिडिओच्या माध्यमातून दावा करण्यात आला. उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम दर्शविणारा फोटो असल्याचे सांगणारा एक दावा झाला. युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेले हिंगलाज मंदिर पाकिस्तानातील सिंध प्रांतात पाडण्यात आले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचायला मिळणार आहेत.
सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणल्याचा हा व्हिडीओ नाही
सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणण्यात आली ते दर्शविणारा व्हिडीओ आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
NDTV पोल ऑफ पोल्सने तेलंगणाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्पष्ट विजय घोषित केला?
NDTV पोल ऑफ पोल्सने तेलंगणाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्पष्ट विजय घोषित केला आहे, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
ही बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम नाही
उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम दर्शविणारा फोटो असल्याचे सांगणारा एक दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
हे उत्तराखंड खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका केल्याचे फुटेज नाही
उत्तराखंडच्या खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका केल्याचे फुटेज असे सांगत एक व्हिडिओच्या माध्यमातून दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
पाकिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर पाडण्यात आले?
युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेले हिंगलाज मंदिर पाकिस्तानातील सिंध प्रांतात पाडण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा