Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर बनावट पोस्टचा धुमाकूळ कायम राहिला. एका महिलेला आलिंगन दिल्यावरून व्यभिचार केल्याचा आरोप ठेऊन फुटबॉलपटू रोनाल्डोला इराण येथील न्यायालयाने फटाके मारण्याची शिक्षा दिली, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. असा दावा करण्यात आला. भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविण्यात येत आहेत, असा दावा करण्यात आला. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी मोटार फिट ग्लायडरमधून किंवा पॅराशूट मधून हमासचे सैनिक उतरले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
रोनाल्डोला इराणमध्ये व्यभिचारासाठी 99 फटके मिळणार?
एका महिलेला आलिंगन दिल्यावरून व्यभिचार केल्याचा आरोप ठेऊन फुटबॉलपटू रोनाल्डोला इराण येथील न्यायालयाने फटाके मारण्याची शिक्षा दिली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला नाही
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत?
भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविण्यात येत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
हमासचे सैनिक पॅराशूटने उतरले?
इस्रायलवर हल्ला करण्यासाठी मोटार फिट ग्लायडरमधून किंवा पॅराशूट मधून हमासचे सैनिक उतरले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा