Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: केळीतील अळीमुळे बारा तासांत मृत्यू ते मविआ सरकारचा मुस्लीम युवकांना...

Weekly Wrap: केळीतील अळीमुळे बारा तासांत मृत्यू ते मविआ सरकारचा मुस्लीम युवकांना भत्ता,या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

Authors

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

केळीतून अळ्या बाहेर काढल्याचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का?

केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि दावा केला आहे की, ‘विषारी अळी असलेली केळी बाजारात आली आहे. न्यूजचेकरच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आणि हा व्हिडिओ भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

काॅंग्रेस नेते राशिद अल्वी यांनी जय श्रीराम बोलणा-यांना राक्षस म्हटले आहे?

सोशल मीडियावर 10 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली जात असून यात, काॅंग्रसेचे नेते राशिद अल्वी यांनी जय श्रीराम बोलणा-यांना राक्षस म्हटले असल्याचे दिसते. या क्लिपमध्ये राशिद अल्वी हिंदीत म्हणतात की, “आज भी बहुत लोग जय श्री राम का नारा लगाते हैं, वो सब मुनि नहीं, निशाचर हैं, ये मुनि नहीं हैं यह तो घोर निशाचर हैं।” पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

राज ठाकरे यांनी कंगना रानौतच्या समर्थनार्थ ट्विट केले? जाणून घ्या सत्य

सोशल मीडियात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ट्विटचा स्क्रीनशाॅट व्हायरल झाला आहे. यात राज ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या समर्थनार्थ हे ट्विट केले आहे तर करिना कपूरवर टिका केली आहे. हे ट्विट हिंदीत केले असून यात म्हटले आहे की, “कंगना जैसी बहादुर औरतें मिलती तो बाबर आगे न बढ़ पाता लेकिन अफ़सोस करीना जैसी ज्यादा मिली जो घुटने टेक के तैमूर पैदा करती रही” याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मविआ सरकारने पोलिस भरतीची तयारी करणा-या मुस्लिम युवकांना मासिक भत्ता सुरु केला आहे?

मविआ सरकारने पोलिस भरतीची तयारी करणा-या मुस्लिम युवकांना मासिक भत्ता सुरु केला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्र पोलिसांमध्ये मुस्लिमांच्या भरतीसाठी एक योजना तयार केली आहे, ज्या अंतर्गत सर्व मुस्लिम युवकांना सरकारी खर्चाने पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण दिले जाईल, याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular