या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. आंध्रप्रदेशातील अमरावतीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यानचा एक फोटो असल्याचा दावा व्हायरल झाला तसेच पालघर साधू हत्याकांडातील मुख्य हत्यारा व राष्ट्रवादीचा नेता संजय शिंदेंचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा दावा व्हायरल झाला. हे आणि इतर दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

आंध्रप्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या नावाने जुना फोटो व्हायरल
आंध्रप्रदेशातील अमरावती येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावाने सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला आहे. यात एक महिला पोलिस कर्मचारी एका युवतीला केसांना पकडून ओढत नेत असल्याचे दिसत आहे. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, आंध्र प्रदेशातील शेतकरी आपल्या जमिनी देतात आणि त्यांना अशा प्रकारे वागणूक मिळते. पण हे असत्य आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

व्हाट्सअप ग्रुप अॅडमिनला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असल्याचा दावा
मध्यप्रदेशातील भिंडच्या जिल्हाधिका-यांनी व्हाट्सअप ग्रुप अॅडमिनला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यासाठी 15 आॅक्टोबरपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन न करणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पडताळणीत हा दावा चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. भिंडच्या जिल्हाधिका-यांनी हा आदेश मागील वर्षी फक्त माध्यमांतील लोकांसाठी दिला होता तो मागेही घेतला. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा दावा
करमाळा- माढा मतदार संघाचे आमदार व राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा कार पेटून मृत्यू झाल्याची बातमी इंडिया टिव्ही या हिंदी न्यूज चॅनलने प्रसिद्ध केली आहे. बातमीत रस्त्याच्या कडेला पेट घेतलेल्या कारचा व्हिडिओ तसेच आमदार संजय शिंदे यांचा फोटो देखील दाखवण्यात आला आहे. मात्र इंडिया टिव्हीची बातमी चुकीची आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

नक्षली भाभीच्या नावाने व्हायरल झाला गोवा काॅंग्रेस प्रभारींचा फोटो
अरुण पुदूर यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेचा आहे. यात कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ एक पुरुष व एक महिला दिसत आहे. हीच महिला हाथरस प्रकरणातील ‘नक्षली भाभी’ आहे व याच महिलेला प्रियंका गांधींनी मिठी मारली असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण हा दावा असत्य आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

पालघर साधू हत्याकांडातील मुख्य हत्या-याचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा दावा
पालघर साधू हत्याकांडातील मुख्य हत्या-याचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पालघर साधु हत्यांकांडाचा मुख्य हत्यारा एनसीपी नेता संजय शिंदे याचा कार अपघातात जळून मृत्यू झाला. भगवान के घर देर है पर अंधेर नहीं. पण हे सत्य नाही. संजय शिंदे आणि पालघर साधू हत्याकांडाचा संबंध नव्हता. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.