Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. व्हाटस्अपवरील गुड माॅर्निंग मेसेज डाऊनलोड केल्यास बॅंक अकाऊंट रिकामे होत असलयाचा दावा व्हायरल झाला याशिवाय शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिल्याचा दावा व्हायरल झाला तर अमिताभ बच्चन यांनी कोरोना लस टोचून घेतल्याचा आणि शिवसेनेने टिपू सुल्तानच्या जयंतीली हिरव्या रंगाचे पोस्टर तयार केल्याच दावा देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हे आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

व्हॉट्सअपवरील गुड मॉर्निंग इमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डिटेल्स चोरी जात असल्याचा दावा करणारा एक मॅसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, चायनीज हॅकर्स अशा शुभेच्छांच्या इमेजेसद्वारे ‘फिशिंग’ करून आपला मोबाईल हॅक करताहेत. गुड माॅर्निंग इमेजेस डाऊनलोड संदर्भात Indian Computer Emergency Response Team ने देखील माहिती दिलेली नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने राम मंदिरासाठी देणगी देण्यास नकार दिल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंदीमध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्टचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, साई ट्रस्टने श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी दान देण्यासाठी नकार दिला, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. पण दोन्ही संस्थाननी हा दाव खोटा असल्याचे म्हटले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

गोव्याला जाताना दावणगिरी मेडिकल असोसिएशनच्या लेडिज विंगच्या टूर बसला अपघात झाला असून यात 17 डाॅक्टर जागेवर मृत पावले असून 3 ते 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. अंत्यंत दुर्देवी घटना. यातील सर्व महिला डाॅक्टर बहुतेक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. असा दावा केला जात आहे, पण हे सत्य नाही. बसमध्ये एकच महिला डाॅक्टर होती तिचा मृत महिलांत समावेश आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

अमिताभ बच्चन यांनी कोरोना लस टोचून घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. व्यंग्यात्मक कमेंट्स करुन हा फोटो शेअर केला जात आहे. सोशल मीडियामध्ये व्हारल होत असलेल्या या फोटोवर लस घ्या पण कोरोनाची रिंगटोन बंद करा असा मजकूर लिहिलेला आढळत आहे. पण हा फोटो एडिट करण्यात आला आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी हिरवा शेला पांघरल्याचा फोटो असेलेले हिरव्या रंगाचे पोस्टर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त प्रकाशित केले असल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे. हे संपूर्ण हिरव्या रंगांचे असून यात शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या गळ्यातील शेला देखील हिरवा दाखवण्यात आला आहे. पण हे सत्य नाही. मूळ पोस्टरचा रंग बदलला आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Shubham Singh
July 6, 2023
Yash Kshirsagar
July 13, 2020
Yash Kshirsagar
January 19, 2021