Authors
सोशल मीडियावर मागील आठवड्यातही फेक क्लेम्सचा पाऊस पडला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय यावर विविध दावे करण्यात आले. कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे नमन केले, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली, असा दावा झाला. पोलिस आणि मीडियाच्या छळामुळे पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारहाण केली, असा दावा झाला. भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केल्याचा दावा झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपणास या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे केले नमन?
कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे नमन केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली?
कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
सीमा हैदरने आत्महत्या केली नाही
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उघडकीस आले.
मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारहाण केली?
मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींबद्दल हे विधान केले नाही
भाजपला सत्तेतून काढून टाकणे हीच सोनिया गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केल्याचा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va23tYwLtOj7zEWzmC1Z