Fact Check
Weekly Wrap: महाकुंभात बिल गेट्सची उपस्थिती ते आढळलेल्या १०० फुटी सापापर्यंतच्या दाव्यांचे फॅक्टचेक
जानेवारी महिन्याच्या चौथ्या आठवड्यातही अनेक फेक दावे करण्यात आले. एका व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना, असा दावा करण्यात आला. आणखी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली, असा दावा करण्यात आला. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते, असा दावा करण्यात आला. महाकुंभात १०० फूट लांबीचा साप आढळला, असा दावा झाला. एक चित्र शेयर करीत चित्तोडगड शाळेच्या प्रकरणात निलंबित झालेल्या शिक्षिकेचा फोटो असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

लॉस अँजेलिस असे सांगून शेयर केलेला हा व्हिडीओ खरा नाही
एका व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक?
एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते?
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

महाकुंभात १०० फूट लांबीचा साप आढळला?
महाकुंभात १०० फूट लांबीचा साप आढळला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.

हा फोटो चित्तोडगड शाळेच्या प्रकरणात निलंबित झालेल्या शिक्षिकेचा नाही
एक चित्र शेयर करीत चित्तोडगड शाळेच्या प्रकरणात निलंबित झालेल्या शिक्षिकेचा फोटो असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा