Authors
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा सुळसुळाट सुरूच राहिला. स्टेजवर वरासह आक्षेपार्ह कपड्यांमध्ये असलेले वधूचे छायाचित्र खरे असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आले. बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडल्याचा दावा करण्यात आला. न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे, असा दावा करण्यात आला. अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातली आहे, असा दावा झाला. पक्ष आणि चिन्ह भविष्यात जाणार असे फडणवीस यांनी सांगितल्याचे उदय सामंत म्हणाले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
स्टेजवर वरासह दिसणारे वधूचे चित्र AI जनरेटेड आहे
स्टेजवर वरासह आक्षेपार्ह कपड्यांमध्ये असलेले वधूचे छायाचित्र खरे असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आले. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने घातली बंदी?
अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
अँकर श्वेता सिंगचा डायबिटीजवर घरगुती उपचार सांगतानाचा व्हिडीओ खरा नाही
अँकर श्वेता सिंगचा डायबिटीजवर घरगुती उपचार सांगतानाचा व्हिडीओ असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडले?
बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
लोकसत्ताचा लोगो असलेले न्यूज कार्ड बनावट
लोकसत्ताचा लोगो असलेले न्यूज कार्ड उदय सामंत यांचे विधान असे सांगत व्हायरल झाले. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा