Authors
नवीन वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात अनेक फेक दावे करण्यात आले. चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आला. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा कल्याण येथील व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. 3000 वर्षे जुनी अनंतपद्मनाभस्वामी मूर्ती असा दावा करण्यात आला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधी यांच्या पायाला स्पर्श करीत असताना फोटोत दिसत आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
रहदारी पोलिसाला मारहाण होण्याची ही घटना मुंबईतील?
चलन जारी केले म्हणून मुंबईत मुस्लिमांकडून रहदारी पोलिसाला मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडीओ कल्याणचा नाही
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा कल्याण येथील व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
ही 3000 वर्षे जुनी अनंतपद्मनाभस्वामी मूर्ती आहे?
3000 वर्षे जुनी अनंतपद्मनाभस्वामी मूर्ती असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
फोटोत मनमोहन सिंग सोनिया गांधींच्या पायाला स्पर्श करताना दिसताहेत?
फोटोत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोनिया गांधी यांच्या पायाला स्पर्श करीत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा