Authors
एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात फेक पोस्टचा पाऊसही सोशल मीडियावर पडतच राहिला. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली, असा दावा करण्यात आला. रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा आहे, असा दावा करण्यात आला. मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली?
खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा नाही
रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकण्याचा फतवा काढण्यात आलाय?
मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही
महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.
बांगलादेशात हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला झाला?
बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा