Authors
सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यातही सोशल मीडियावरील फेक दाव्यांचा पाऊस सुरूच राहिला. तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत, असा दावा करण्यात आला. टोल कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ भारतातील आहे, असा दावा करण्यात आला. निपाणी येथे माश्याच्या पोटात गोळ्या ठेवणाऱ्या एक व्यक्तीला पोलिसांनी पकडले, असा दावा करण्यात आला. प्रचंड खड्डे पडलेल्या आणि त्यातून वाहने उडणाऱ्या रस्त्याचा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला. गणपतीच्या पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
तिरुपती लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीत सर्व मुस्लिम आहेत?
तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले.
टोल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ भारतातील?
टोल कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ भारतातील आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
माश्याच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या ठेवणाऱ्यास पकडले?
निपाणी येथे माश्याच्या पोटात गोळ्या ठेवणाऱ्या एक व्यक्तीला पोलिसांनी पकडले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील रस्त्याचा नाही
प्रचंड खड्डे पडलेल्या आणि त्यातून वाहने उडणाऱ्या रस्त्याचा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
गणपती पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले?
गणपतीच्या पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे दिसून आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा