Authors
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकीकडे परतीचा पाऊस वाढत चाललेला असताना सोशल मीडियावरही फेक पोस्टचा पाऊस पडतच राहिला. गोव्यामध्ये ओव्हरलोडिंगमुळे बोट बुडाली, असा दावा एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे, असा दावा करण्यात आला. आईने मुलाचा मोबाईल काढून घेऊन अभ्यास करण्यास भाग पाडल्यानंतर त्याच्याकडून आईला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली, असा दावा करण्यात आला. गुगल इन्व्हेस्ट या गुंतवणूक प्लॅटफॉर्मचे समर्थन सुंदर पिचाई करीत आहेत, असा दावा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
पाण्यात बोट बुडतानाचा व्हायरल व्हिडीओ गोव्याचा नाही
गोव्यामध्ये ओव्हरलोडिंगमुळे बोट बुडाली, असा दावा एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
उर्दू भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा असे उद्धव ठाकरे म्हणाले?
मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.
मोबाईल काढून घेतल्यावरून मुलाने आईला क्रिकेटच्या बॅटने मारले?
आईने मुलाचा मोबाईल काढून घेऊन अभ्यास करण्यास भाग पाडल्यानंतर त्याच्याकडून आईला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
सुंदर पिचाई यांनी गुंतवणूक योजनेचे समर्थन केले?
गुगल इन्व्हेस्ट या गुंतवणूक प्लॅटफॉर्मचे समर्थन सुंदर पिचाई करीत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट?
लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा