Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे...

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

विविध व्हायरल दाव्यान्नी मागील आठवड्यातही धुमाकूळ घातला. पुण्यात एका हिंदू तरुणीवर मुस्लिमाने जीवघेणा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर कुत्र्यांचे मांस पकडण्यात आले आहे, असा एक दावा झाला. समान नागरी कायद्यासाठी समर्थन देण्यास एका क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले. कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या मोफत बससेवा योजनेचा लाभ घेताना एका महिलेला हात गमवावा लागला, असा दावा झाला. जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रवेश देण्यापासून रोखले असा दावा झाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

राष्ट्रपती मुर्मू यांना जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिल्लीतील जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मोफत बस प्रवास योजनेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात महिलेने हात गमावला?

कर्नाटकात मोफत बस प्रवास योजनेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात महिलेने हात गमावला असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

नाशिक रेल्वे स्थानकावर कुत्र्याचे मांस सापडले नाही

महाराष्ट्रातील नाशिक रोड रेल्वेस्टेशनवर कुत्र्यांचे 500 किलो मांस पकडले गेले, असा दावा करण्यात आला. हा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात उघड झाले.

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाला नाही

पुण्यात एका मुस्लिमाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केला पण लोकांनी तिला वाचवले, असा दावा करण्यात आला. मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मिस्ड कॉल मोहीम समान नागरी कायद्यासाठी नव्हे

समान नागरी कायद्याला समर्थन करण्यासाठी ही सोशल मीडिया मोहीम असून 9090902024 वर मिस्ड कॉल द्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular