Authors
२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीला जोडून असंख्य दावे व्हायरल झाले. महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा झाला. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल. असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा झाला. काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आलाय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा व्हिडीओ नाही
एका व्हिडिओच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय?
सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेना (UBT) सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल असे संजय राऊत म्हणाले?
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला?
महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा?
काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आलाय, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा