Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर दोन छायाचित्रांचा कोलाज शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की, रक्ताने माखलेले छायाचित्र 26/11/2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हुतात्मा कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांचे आहे.
छायाचित्र शेअर करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी लिहिले की, बंदुकीच्या गोळ्या खाऊनही पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पकडणारे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम.
संग्रहित ट्विट येथे पाहू शकता.
हा व्हायरल फोटो सुदर्शन चॅनलच्या पत्रकार आंचल यादव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
संग्रहित ट्विट येथे पाहू शकता.
हे दोन फोटो शेअर करत मेजर सुरेंद्र पुनिया नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्याबद्दल देशाच्या येणाऱ्या पिढ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या ऋणी असतील, अन्यथा ISI, मॅडम सोनिया/राहुल/प्रियांका गांधी/ या कुटुंबाचे गुलामांनी 26/11 दहशतवादी मुंबई हल्ल्याला नेहमीच “हिंदू दहशतवादी” म्हणत संपूर्ण धर्माची बदनामी केली असती.’
संग्रहित ट्विट इथे वाचा.
हा दावा फेसबुकवर देखील मोठया प्रमाणात शेअर होत आहे.
व्हायरल फेसबुक पोस्ट इथे पाहू शकता.
लाइव्ह हिंदुस्थानने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग हादरले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला अतर 300 हून अधिक जण जखमी झाले. 26 नोव्हेंबरला मुंबई हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण झाली, पण मुंबई हल्ल्याच्या जखमा अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. अमर उजालाच्या वृत्तानुसार, अजमल कसाब हा एकमेव पाकिस्तानी दहशतवादी होता जो मुंबई हल्ल्यात जिवंत पकडला गेला होता. कसाबला पकडण्याचे श्रेय कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांना जाते, कारण तुकारामने कसाबच्या AK-47 रायफलची बॅरल हिसकावून घेतली. तो गोळीबार करत राहिला, पण त्यांनी त्याला सोडले नाही. तुकाराम ओंबळे यांनी काठीने AK-47 चा सामना केला आणि दहशतवादी कसाबला जिवंत पकडले.
व्हायरल फोटो सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गुगल रिव्हर्सच्या मदतीने शोधण्यास सुरुवात केली. प्रक्रियेदरम्यान, आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्स मिळाले, त्यानुसार, हे चित्र 2019 मध्येही व्हायरल झाले होते. रिपोर्ट्समध्ये, हे चित्र मुंबई हल्ल्यावर आधारित ‘The Attack Of 26/11’ या चित्रपटातील दृश्य असल्याचे म्हटले आहे. यानंतर आम्ही काही कीवर्डसह यूट्यूबवर शोध घेतला. यादरम्यान आम्हाला ‘The Attack Of 26/11’ चित्रपटाचा 14:07 मिनिटांचा व्हिडिओ Eros now movies च्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर या व्हिडिओतील स्क्रीनशॉट व्हायरल होत असल्याचे दिसून आले. व्हिडिओमधील 13 व्या मिनिटाच्या दृश्याचा व्हायरल स्क्रिनशाॅट पाहता येतो.
मुंबई हल्ल्यावर बनलेल्या या चित्रपटात कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळेंची भूमिका अभिनेता सुनील जाधवने साकारली आहे.
अशाप्रकारे आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेल्या कोलाजपैकी एक फोटो मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांचा आहे, परंतु रक्ताने माखलेला दुसरा फोटो ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटात भूमिका केलेल्या अभिनेते सुनील जाधव यांचा आहे. तोच फोटो खरा समजून शेअर केला जात आहे.
YouTube
Media reports
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
May 24, 2025
Prasad S Prabhu
May 19, 2025
Prasad S Prabhu
April 22, 2025