Friday, December 27, 2024
Friday, December 27, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून झाले...

फॅक्ट चेक: अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून झाले हे आंदोलन? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले.
Fact

हा दावा अंशतः खोटा आहे. काँग्रेसचे उमेदवार कुणालबाबा पाटील पराभूत झाले म्हणून असंतोष व्यक्त झाला आहे. दरम्यान त्यांना अवधान गावात १०५७ मते पडली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएमचा घोळ असा आरोप करीत अनेक मतदारसंघात लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले, असे सांगणारा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

आम्हाला हा दावा X आणि Facebook या दोन्ही माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असल्याचे दिसून आले.

“अवधान गाव.. कुणाल बाबा ला 0 मतदान दाखवत आहे.. जे गाव 70% त्यांच्या संस्थेत काम करते.. कट्टर कार्यकर्ते आहेत.. आंदोलन करत आहेत ते लोक.. नक्कीच घोटाळा” अशा समान कॅप्शनखाली हा दावा करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

अशाप्रकारचे दावे येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

Fact Check/ Verification

दाव्याच्या कॅप्शनमध्ये अवधान गाव आणि कुणाल बाबा असा उल्लेख आढळला. दरम्यान संबंधित दावा नेमक्या कोणत्या मतदारसंघाबद्दल आणि कोणत्या उमेदवाराबद्दल भाष्य करीत आहे? याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. Google वर शोध घेतल्यावर अवधान हे गाव महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण मतदारसंघात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. दरम्यान आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संबंधित मतदारसंघाचा जाहीर झालेला निकाल आम्ही पाहिला.

फॅक्ट चेक: अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून झाले हे आंदोलन? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: ECI Website

या निकालात आम्हाला धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपचे राघवेंद्र मनोहर पाटील हे विजयी झाल्याचे आणि काँग्रेसचे कुणालबाबा रोहिदास पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले. दोघांमधील मतांचा फरक ६६ हजार ३२० इतका आहे. विजयी राघवेंद्र पाटील यांना १७०३९८ आणि पराभूत कुणालबाबा यांना १०४०७८ इतकी मते मिळाल्याचे दिसून आले. व्हायरल दावा ज्या कुणालबाबा यांच्याबद्दल माहिती देत आहे ते कुणालबाबा याच मतदारसंघातील असल्याचे स्पष्ट होताच आम्ही आणखी शोध घेतला.

आम्हाला संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेताना “कुणाल पाटलांना त्यांच्याच गावातून 0 मतं? सत्य काय?” अशा शीर्षकाखालील Mumbai Tak वाहिनीने केलेला रिपोर्ट X खात्यावर २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्ट केला असल्याचे दिसले. यामध्ये “कुणाल पाटील यांच्या पराभवानंतर आंदोलन आणि असंतोष व्यक्त झाला. त्यांच्या अवधान गावातून त्यांना शून्य मते मिळाल्याची चर्चा झाली, मात्र त्यांना अवधान या गावातून १०५७ मते मिळाली आहेत.” अशी माहिती आम्हाला मिळाली.

आम्ही संबंधित वाहिनीच्या स्थानिक पत्रकार विशाल ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. ” असंतोष व्यक्त झाला ही बाब खरी आहे. मात्र अवधान गावातून कुणालबाबा पाटील यांना १०५७ मते पडली आहेत. अशीच माहिती दिली.”

आम्ही काँग्रेस उमेदवार कुणालबाबा पाटील यांच्या कार्यालयाशीही संपर्क साधला. मतमोजणीवेळी निवडणूक आयोगाकडून दिला जाणारा गाव आणि बूथ निहाय मतदानाच्या आकडेवारीचा तक्ताही आम्हाला मिळाला. यामध्ये सुद्धा अवधान गावच्या बूथ क्रमांक २४७, २४८, २४९ आणि २५० मध्ये कुणालबाबा पाटील यांना पडलेल्या मतांची बेरीज १०५७ इतकी असल्याचे आम्हाला दिसून आले. संबंधित मतदान आकडेवारीचा तक्ता खाली पाहता येईल.

फॅक्ट चेक: अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून झाले हे आंदोलन? जाणून घ्या सत्य काय आहे

दरम्यान निवडणूक आयोग किंवा धुळे जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात काही भाष्य करण्यात आले आहे का? याचा आम्ही शोध घेतला. आम्हाला धुळे जिल्हा माहिती कार्यालयाने यासंदर्भात २५ नोव्हेंबर रोजी केलेले ट्विट पाहायला मिळाले. यामध्ये धुळे ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांचा हवाला देऊन “सोशल मीडियावर #धुळे ग्रामीण मतदार संघातील #अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. याबाबत शहानिशा केल्यावर ती अफवा असून फेक न्यूज व्हायरल करून चुकीची माहिती समाजात पसरवली जात आहे.” असे सांगण्यात आले आहे.

Courtesy: X@InfoDhule

यावरून संबंधित दावा दिशाभूल करीत व्हायरल झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले, हा दावा अंशतः खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार कुणालबाबा पाटील पराभूत झाले म्हणून असंतोष व्यक्त झाला आहे. दरम्यान त्यांना अवधान गावात १०५७ मते पडली आहेत.

Result: Partly False

Our Sources
Result declared by ECI Website
Tweet made by Mumbai Tak on November 25, 2024
Conversation with Local Journalist Vishal Thakur
Conversation with Congress Leader Kunalababa Patils Office
Tweet made by District Information Office Dhule on November 25, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular