Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
रात्रीच्या अंधारात रस्त्यावर आलेल्या दोन वाघांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात आला आहे की, हे वाघ 19 आॅगस्ट 2021 रोजीच्या रात्री महाबळेश्वर- पाचगणी रोडवर पर्यचकांच्या गाडी समोर आले होते, त्यावेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आणि अरुण फिरोदिया यांनी देखील याच दाव्याने शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांना देकील ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Fact Check/Verification
व्हायरल होत असलेला दावा कितपत खरा आहे याची पडताळणी करण्यासाठी आम्ही काही किवर्डसच्या आधारे शोध सुरु केला असता आम्हाला Indian Express ची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की महाबळेश्वर-पाचगणी रोडवर दोन वाघ कमे-यात कैद झाले असतून आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
गुगलवर “पाचगणी महाबळेश्वर रोड वाघ” या विशिष्ट कीवर्डवर शोध घेताना, आम्हाला एनडीटीव्हीचा अहवाल सापडला ज्यामध्ये असे दिसून आले आहे की अनेक युजर्सनी आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओला अलीकडील नाही असे म्हटले आहे.
याविषयी अधिक शोध घेतला असता आम्हाला “ट्रान्स फिटनेस” या युट्यूब चॅनलेनवर याविषयी अधिक शोध घेतला असता आम्हाला “ट्रान्स फिटनेस” या युट्यूब चॅनलेनवर हा 29 नोव्हेंबर 2019 अपलोड करण्यात आलेला व्हायरल व्हिडिओ आढळून आला. यात हा व्हिडिओ ताडोबा राष्ट्रीय अभयारण्यातील असल्डोयाचे म्हटले आहे.
Conclusion
यावरुन स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ सध्याचा नाही तर दोन वर्षापुर्वीचा आहे. तेसच तो महाबळेश्वर-पाचगणी रोडवरील नाही. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने व्हायरलहोत आहे.
Result: Misplaced Context
Our Sources
YouTube video published by Trans Fitness
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.