Monday, December 23, 2024
Monday, December 23, 2024

HomeFact Checkबीएमसीने लाॅकडाऊनची नवी नियमावली जारी केलेली नाही, खोटी पोस्ट व्हायरल

बीएमसीने लाॅकडाऊनची नवी नियमावली जारी केलेली नाही, खोटी पोस्ट व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बीएमसीने लाॅकडाऊनची नवी नियमावली जारी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्या नंतर राज्यात 15 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर 30 एप्रिल पर्यंत मुंबई सह राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात या दरम्यान नियमावली देखील लागू करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच राहिल्याने 15 में पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. याच दरम्यान बीएमसीच्या नव्या नियमावलीची यादी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आमच्या एका वाचकाने बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) नावाने जारी झालेली ही यादी आम्हाला पाठवून याची सत्यता पडताळणी करण्यास सांगितले आहे.

नियमावलीत काय म्हटले आहे?

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. 1 मे पासून गॅस एजन्सी दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार, स्टेशनरी शॉप मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार, औषध दुकाने सर्व दिवस 24 तास सुरू राहणार, किराणा दुकाने आणि दूध विक्री केंद्रे सर्व दिवस सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार, चपला आणि कपड्यांची दुकाने सोमवार आणि गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खुली राहणार, जनरल स्टोअर्स मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार, घाऊक भाजी बाजार सर्व दिवस सकाळी 5 चे सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार, डॉमेस्टिक रिपेअर्ससाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ असेल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

Fact Check/Verification

बीएमसी ने मुंबईत खरंच 1 मे पासून नवी नियमावली लागू केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला लाॅकडाऊनचा कालावधी वाढविल्याच्या बातम्या आढळून आल्या मात्र यात कुठेही मुंबईसाठी महापालिकेने नवी नियमावली लाग केल्याचा उल्लेख आढळून आला नाही.

अधिक शोध घेतला असता Mumbailive या वेबसाईटवर बातमी आढळून आली . यात म्हटले आहे की सोशल मीडियात व्हयरल होत असलेला मेसेज खोटा आहे. बातमीत म्हटले हे की, मुंबई महापालिकेच्या नावाने नव्या नियमावलीचा मेसेज व्हायरल झाला असून तो खोटा आहे. याबाबत महापालिकेने स्पष्टिकरण दिले आहे.

अधिक माहिती मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या ट्विटर हॅंडलला भेट दिली असता आम्हाला या संदर्भात ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली ही माहिती खोटी असून मुंबई महापालिका प्रशासनाने असे कुठलेही नियम जाहीर केलेले नाहीत, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वेच मुंबईतही लागू असतील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवूही नये, असे आवाहन पालिकेनें नागरिकांना ट्विटरवर केले आहे.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, मुंबई महापालिकेने 1 मे पासून लाॅकडाऊनची नवीन नियमावली लागू केलेली नाही. राज्य सरकारने तयार केलेली आधीचीच निर्बंधाची नियमावली मुंबईत लागू असणार आहे .

Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?

Result: False

Claim Review: बीएमसीची मुंबईत 1 मे पासून लाॅकडाऊनची नवी नियमावली
Claimed By: Social Media post
Fact Check: Misleading

Our Sources

मुंबई लाईव्ह- https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-clarification-on-new-guidelines-fake-viral-message-64373

बीएमसी- 


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular