Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोसल मीडियात ट्रेनमधून धधबब्याचे विहंगम दृश्य दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील लोणावळा- खंडाळा घाटातील विहंगम दृश्याचा आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, नयनरम्य लोणावळा- खंडाळा घाट, गार्डने घेतलेला विहंगम दृश्याचा व्हिडिओ धन्यवाद गार्ड… सुंदर आपला महाराष्ट्र…
हे देखील वाचा : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते?
Fact Check / Verification
व्हायरल व्हिडिओ नमका कुठला आहे याचा शोध घेण्याकरिता आम्ही या व्हिडिओतील काही कीफ्रेम्स काढल्या आणि रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला असता 22 जुलै 2021 रोजीचा एक व्हिडिओ युट्युबवर आढळून आला. याच्या कॅप्शनमध्ये Amazing view of Braganza Ghats in Hubli – Goa section – Captured from Brake van असे लिहिले आहे. याचा अर्थ असा की “हुबळी – गोवा विभागातील ब्रागांझा घाटांचे विहंगम दृश्य विभाग – ब्रेक व्हॅनमधून घेतले. ”
हा व्हिडिओ कर्नाटकमधील हुबळी विभागातील रेलवेमार्गावरील घाटातील विहंगम दृश्याचा असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला असल्याने याबाबत आम्ही तपास पुढे सुुरुच ठेवला.
युट्युब व्हिडिओतील किवर्डसच्या आधारे गुगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हॅंडलवर 17 जुलै 2021 रोजीचे ट्विट आढळून आले ज्यात हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात देखील हा व्हिडिओ हुबळी- गोवा विभागातील ब्राझांगा घाटातील विहंगम दृश्याचा असल्याचे म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर देखील हा व्हिडिओ 17 जुलै रोजी शेअर करण्यात आहे. या व्हिडिओला 24 हजार लाईक्स मिळाल्या आहेत.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील लोणावळा-खंडाळा घाटातील विहंगम दृश्याचा नाही तर हुबळी- गोवा रेल्वेमार्गावरील ब्राझांगा घाटातील आहे. हा व्हिडिओ ओडिशातील असल्याचा चुकीचा दावा देखील व्हायरल झाला होता.
Result: Misleading
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.