Saturday, September 25, 2021
Saturday, September 25, 2021
घरFact Checksव्हायरल व्हिडिओ हैद्राबादमधील मेट्रो पुलाचा नाही, हे आहे सत्य

व्हायरल व्हिडिओ हैद्राबादमधील मेट्रो पुलाचा नाही, हे आहे सत्य

सोशल मीडियात सध्या एका पुल पडून त्या खाली अनेक गाड्या दबल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ हैद्राबादमधील मेेट्रो पुलाचा आहे. तसेच दुसरा दावा असाही करण्यात येत आहे की हैद्राबादमधील बालानगर भागातील हा फ्लायओव्हर असून यात अनेक गाड्या दाबल्या गेल्या आहेत. ट्रॅफिक जाम झाल्याने या भागातून प्रवास टाळण्याचे आवाहन ही काही व्हायरल पोस्टमधून करण्यात येत आहे.

आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची पडताळणी करण्याची तो आम्हाला पाठवला. याशिवाय ट्विटरवर देखील हा व्हिडिओ आम्हाला याच दाव्याने आढळून आला.

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

काही किवर्डसच्या साहाय्याने आम्ही गूगलमध्ये शोध घेतला पण आम्हाला कुठेही हैद्राबादमधील मेट्रो पुल कोसळल्याची बातमी आढळून आली नाही. यानंत आम्ही व्हायरल व्हिडिओतील स्क्रीनशाॅट्स काढले आणि Google Reverse Image च्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली.

आम्हाला 2018 मधील एक व्हिडिओ VOA News या युट्यूब चॅनलवर आढळून आला ज्यात व्हायरल व्हिडिओतील दृश्यांची मिळती जुळती दृश्ये होती.

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये वाराणसीत निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता असे म्हटले आहे.

आम्ही या संदर्भात काही कीवर्ड्स वापरुन गूगलमध्ये शोध घेतला असता वाराणसीच्या दुर्घटनेच्या अनेक बातम्या आम्हाला आढळून आल्या. याशिवाय मध्ये अशाच घटनेचे कित्येक बातमीदार अहवाल आढळले. तसेच Asian News International (ANI) या वृत्तसंस्थेचे ट्विट देखील आढळून आले. यात वाराणसीच्या कॅन्टोन्मेंटमधील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याच्या ठिकाणावरील दृश्ये आहेत व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये देखील सारखीच आहेत हे या ट्विटवरुन लक्षात येेते.

याशिवाय आम्हाला व्हायरल व्हिडिओ विषयी देखील तेलगंणा पोलिसांचे ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, व्हायरल व्हिडिओ बालनगर-हैदराबादचा नाही. हा वाराणसीचा दोन वर्षांचा व्हिडिओ आहे. DD News ने याची बातमीदेखील दाखवली होती.

Conclusion

यावरुन हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षापूर्वा वाराणसीमध्ये कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा आहे, हैद्राबादमधील मेट्रो पुलाचा किंवा उड्डाणपुलाचा नाही.

Result- Misleading

Our Sources

VOA News- https://www.youtube.com/watch?v=I3KKCXg0H5s

ANI- https://twitter.com/ANINewsUP/status/996384562862211072

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular