Authors
Claim
हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघासमोर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या.
Fact
व्हायरल झालेला व्हिडीओ एडिट केला आहे. वास्तविक व्हिडिओमध्ये अशी कोणतीही घोषणा नाही.
27 सप्टेंबर रोजी पाकिस्तान क्रिकेट संघ सात वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचला. हैदराबाद विमानतळावर उतरलेल्या पाकिस्तान संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाकिस्तानचा संघ सध्या हैदराबादमध्ये असून 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावरून बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत.
व्हायरल व्हिडिओ 20 सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये बाबर आझम आणि पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विमानतळाबाहेर येताना दिसत आहेत. यावेळी व्हिडिओमध्ये लोक ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देतानाही ऐकू येत आहेत.
Fact Check/ Verification
व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, Newschecker ने प्रथम संबंधित कीवर्डच्या मदतीने ट्विटरवर शोध घेतला. आम्हाला 27 सप्टेंबर 2023 रोजी ANI च्या अधिकृत X खात्याने शेअर केलेला व्हिडिओ सापडला.
एएनआयच्या या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओतील दृश्ये आहेत, परंतु आम्हाला ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ सारख्या घोषणा ऐकू आल्या नाहीत, त्याऐवजी लोकांना बाबर भाई-बाबर भाई अशा घोषणा देताना ऐकू येते. तुम्ही तो भाग 1 मिनिट 25 सेकंदानंतर ऐकू आणि पाहू शकता.
तपासादरम्यान, आम्हाला 28 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत X खात्यावरून शेअर केलेला व्हिडिओ देखील सापडला. हैदराबाद विमानतळावर पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे प्रेक्षक स्वागत करतानाचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण या व्हिडीओमध्येही आम्हाला अशी कोणतीही घोषणा ऐकू आली नाही, जी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आहे.
तपासादरम्यान, आम्हाला सहारा समयचे पत्रकार सूर्या रेड्डी यांनी 27 सप्टेंबर रोजी केलेले ट्विटही आढळले. या ट्विटमध्ये विमानतळाचा व्हिडिओ देखील आहे, परंतु या व्हिडिओमध्येही आम्हाला पाकिस्तान मुर्दाबादचा नारा ऐकू आला नाही.
याव्यतिरिक्त, आम्हाला 27 सप्टेंबर रोजी Cricket & Stuff नावाच्या व्हेरीफाईड X खात्याद्वारे शेअर केलेला 20-सेकंदाचा व्हिडिओ सापडला. या व्हिडिओची सर्व दृश्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओशी तंतोतंत जुळतात. खालील चित्रांवरून हे सहज समजू शकते.
जेव्हा आम्ही क्रिकेट अँड स्टफच्या खात्यावरून अपलोड केलेला व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला तेव्हा आम्हाला ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा ऐकू आल्या नाहीत, उलट आम्हाला आढळले की तेथे उपस्थित लोक बाबर आझमला पाहून बाबर भाई-बाबर भाई ओरडताना दिसतात, याचवेळी बाबरने हसून हात हलविल्याचेही पाहायला मिळते.
तपासादरम्यान, आम्ही व्हायरल दाव्याशी संबंधित बातम्यांचे रिपोर्ट देखील तपासले. व्हायरल दाव्याचा उल्लेख करणारे कोणतेही वृत्त आम्हाला आढळले नाही, परंतु पाकिस्तानी क्रिकेट संघाचे भारतात स्वागत केल्याबद्दल बाबर आझमने उल्लेख केल्याचे वृत्त आम्हाला आढळले.
त्यावेळी हैदराबाद विमानतळावर उपस्थित असलेले क्रीडा पत्रकार रोहित जुगलन यांच्याशीही आम्ही संपर्क साधला. व्हायरल झालेल्या दाव्याचे त्यांनीही खंडन केले आणि त्यावेळी अशी कोणतीही घोषणाबाजी झाली नसल्याचे सांगितले.
Conclusion
आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओ संपादित केला आहे. वास्तविक व्हिडिओमध्ये अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
Result: False
Our Sources
Video Shared by ANI’s X account on 27th sep 2023
Video Shared by PCB’s X account on 28th ep 2023
Video Shared by Surya Reddy’s X account on 27th sep 2023
Video Shared by Cricket & Stuff’s X account on 27th sep 2023
Article Published by Gulf Today on 4th october 2023
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजयकुमार यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा