Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeMarathiउमर खालिदने मुंबईत 'हिंदुओं से आझादी' ची घोषणा दिली नाही, खोटा दावा...

उमर खालिदने मुंबईत ‘हिंदुओं से आझादी’ ची घोषणा दिली नाही, खोटा दावा व्हायरल

Authors

Claim

मुस्लिम आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी मुंबईत हिंदूओं से आझादी घोषणा दिल्या. 

Verification
दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीमध्ये 5 तारखेच्या रात्री उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरात विर्द्याथी आंदोलन करत आहेत. पाश्वर्भूमीवर जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद याच्या नेतृत्वात काल रात्री मुंबईत गेट वे आॅफ इंडिया समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले यावेळी घोषणाही देण्यात आला. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदरसिंग पाल बग्गा यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर या आंदोलनाचा 18 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे कि मुस्लिम आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी हिंदुओं से आझादी च्या घोषणा दिल्या.
याबाबतीत आम्ही पडताळणी करण्याचे ठरविले असता आणखी काही ट्विट्स आम्हाला आढळून आले. यात मुंबई भाजपचे प्रवक्ते यांनी हाच व्हिडिओ शेअर केला आहे याशिवाय आणखी काही लोकांनी देखील हा 18 सेंकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
फेसबुक वर देखील हा व्हिडिओ यात दाव्यानिशी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सगळ्या पोस्टमधील दाव्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही याबाबत आणखी शोध घेण्याचे ठरविले. शोध सुरु असताना आम्हाला आ आंदोलनाचे फेसबुक लाइव एक पेज आढळून आले. हा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर 17 मिनिट 53 सेंकदांनी उमर खालिदच्या या घोषणा सुरू होतात. तो  NPR से (आज़ादी),और CAA से (आज़ादी),और CAA से (आज़ादी), तो जातिवाद से (आज़ादी), और मनुवाद से (आज़ादी), और संघवाद से (आज़ादी), और RSS से (आज़ादी), और RSS से (आज़ादी), तो भगवत से भी (आज़ादी), तो उस मोदी से (आज़ादी)”  या घोषणा देताना एेकू येतात
याशिवाय यूट्यूब वर देखील या आंदोलनाचा व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ सुरु झाल्यांनतर 52 मिनिटे 49 सेंकदापासून या घोषणा आपण एेकू शकता। यात कुठेही हिंदुओं से आझादी हे एेकू येत नाही.
याशिवाय उमर खालिद याने ट्विट करुन सांगितले आहे की बग्गा यांचा दावा खोटा आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की विद्यार्थ्यांनी हिंदुविरोधी घोषणा दिल्या नव्हत्या, सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल होत आहे.
Tools Used 
Google Keywords Search
facebook Search
Twitter Advanced Search
Youtube Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular