Claim–
Pakistani flags … in Jalandhar Punjab , this area Vijay Colony is infested with Christian Missionaries
हिंदी अनुवाद –
पंजाबमधील जालंधरमध्ये पाकिस्तानी झेंडा. शहरातील हे ठिकाण विजय काॅलनीती आहे येथे ख्रिश्चन मिशनरींचा प्रभाव आहे.
Verification-
सोशल मिडियात पंजाब संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका घराच्या छतावर काही झेंडे फडकताना दिसत आहेत. जालंधरमधील विजय काॅलनीतील एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचा दावा हा व्हिडिओ शेअर करणा-या युजरचा दावा आहे.
हा व्हिडिओ टविटर शिवाय फेसबुक वर देखील शेअर करण्यात आला आहे.
आम्ही या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी यातील काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल वर शोध घेतला.
याद दरम्यान आम्हाला
पंजाब लाइव वृत्तसंस्थेच्या वेबसाइटवरील एक लेख मिळाला. या लेखानुसार जालंधरमधील विजय काॅलनीतील घरांवर पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आले होते. पोलिस त्या ठिकाणी पोहचले आणि झेंडे उतरवले पण नंतर पोलिसांच्या तपासात आढळून आले की ते झेंडे मुस्लिम धर्माचे होते त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही.
याबाबत शोध सुरू ठेवला असता
पंजाब केसरी मध्ये छापलेला एक लेख मिळाला. यात जालंधरमधील विजय काॅलनीत पाकिस्तानी झेंडा नाही तर मुस्लिम धर्माचे झेंडा फडकवल्याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय आम्ही विजय काॅलनीत फडणकारा झेंजा आणि पाकिस्तानी झेंडा यांची तुलना केली.
दोन्ही झेंड्यांची तुलना केल्यानंतर काही बाबी समोर आल्या-
1 – पाकिस्तानी झेंड्यामध्ये एक पांढ-या रंगाचा पट्टा असतो तर मुस्लिम धर्माच्या या झेंड्यामध्ये पांढ-या रंगाचा पट्टा नाही.
2 – पाकिस्तीन झेंड्यातील चंद्र आणि चांदणीचा आकार हा मुस्लिम धर्माच्या झेंड्यातील चंद्र आणि चांदणीपेक्षा लहान आहे.
Newsckeckerin टीमच्या पडताळणीत व्हायरल दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. व्हिडिओत दिसत असलेला झेंडा हा पाकिस्तानचा नाही तर मुस्लिम धर्माचा झेंडा आहे.
Tools used
Result-False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा [email protected])