Tuesday, April 16, 2024
Tuesday, April 16, 2024

HomeMarathiपोलिसांनी नाही केले CAA आणि NRC च्या विरोधात धरणे आंदोलन. वाचा नेमके...

पोलिसांनी नाही केले CAA आणि NRC च्या विरोधात धरणे आंदोलन. वाचा नेमके काय आहे सत्य ?

Authors

Claim

सामान्य नागरिकांनंतर आता पोलिस देखील CAA आणि NRC च्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत. 

 
 
Verification
 
ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे यात काही पोलिस हातात सुधारित नागरिकता सुधारणा कायदा आणि नागरिक नोदंणी प्रक्रियेच्या विरोधात हातात फलक घेऊन धरणे आंदोलन करत असल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की आता पोलिस देखील सीएए आणि एनआरसीच्या विरोधात निष्पाप लोकांच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत. या पोलिसांना माझा सलाम..पण ईव्हीएम द्वारे मते चोरुन सरकार स्थापन करणा-या मोदी यांनी शाह यांना शरम नाही वाटत. 
 
असाच आणखी एक दावा ट्विटर वर आढळून आला. 
 
 
दोन्ही ट्विटमध्ये पोलिस एनआरसी अणि सीएए विरोधात फलक हातात घेऊन आंदोलन करत असल्याचे दिसत आहे पण दोन्ही पोस्टमध्ये हो पोलिस कोणत्या राज्यातील आहेत याची माहिती दिली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोणत्या राज्यात पोलिसांनी कधी आंदोलन केले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केले सीएए आणि एनआरसी  विरोधात आंदोलन या किवर्ड्सच्या आधारे गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही.  
 
यानंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्सच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला असता याचे अनेक रिझल्ट आढळून आले.
 
 
याशिवाय आम्हाला लाईव्ह मिंट या वेबसाईटवर हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे कि दिल्ली पोलिसांनी तीस हजारी कोर्टात वकिलासोबत झालेल्या बाचाबाची सह नेहमीच पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात 5 नोव्हेंबर रोजी आंदोलन केले. 
 
 
दिल्ली पोलिसांच्या आंदोलनावर किरण बेदी यांनी कायद्याचे पालन व्हावे असे वक्तव्य केले होते. याची बातमी आज तक या हिदी न्यूज वेबसाईटवर प्रकाशित झाली होती.  
 
 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की दिल्ली पोलिसांच्या धरणे आंदोलनाच्या फोटो हा एडिट करुन तो एनआरसी आणि सीएए कायद्या विरोधात पोलिस सुद्धा आंदोलन करत असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. 
 
 
Tools Used 
 
Google Search
Twitter Advanced Search
Yandex Image 
 
Result- Misleading
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular