Saturday, April 20, 2024
Saturday, April 20, 2024

HomeMarathiयुपी पोलिस दलातील नाही हा अधिकारी, जाणून घ्या आरएसएसच्या गणवेशातील व्यक्तिबद्दल खरी...

युपी पोलिस दलातील नाही हा अधिकारी, जाणून घ्या आरएसएसच्या गणवेशातील व्यक्तिबद्दल खरी माहिती 

Authors

Claim
 
यूपी पुलिस क्यों निर्दोष लोगों को मौत के घाट उतार रही है। इस फोटो को देखकर आपको समझ आ जाएगा ।  
 
मराठी अनुवाद- उत्तर प्रदेशातील पोलिस निष्पाप लोकांना मारत आहेत. हा फोटो पाहून लक्षात येईल. 
 
 
 
Verification
 
ट्विटरवर दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत पहिल्या फोटोत एक पोलिस अधिका-याचा फोटो शेयर करण्यात आला आहे तर दुसरा फोटोत तो पोलिस अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात लोकसभा स्पीकर ओमप्रकाश बिर्ला यांच्यासोबत उभा आहे. ट्विटमध्ये असा तर्क देण्यात आला आहे की पोलिसच संघाचे स्वयंसेवक असतील तर निष्पाप लोकांना मारहाण होणारच. 
 
एनआरसी आणि सीएए च्या पार्श्वभूमीवर हा दावा व्हायरल झाल्याने याची पड़ताळणी करणे
गरजेचे होते. याबाबत आम्ही शोध सुरु केला असता अशाच प्रकारचे दावे ट्विटर आणि फेसबुकवर देखील आढळून आले.
 
 
 
यानंतर आम्ही फोटोतील पोलिस अधिका-याच्या बाबतीत माहिती गोळा करायला सुरुवात केली. तर गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोध सुरू केला असता. आम्हाला एक ट्विटवर अकाउंटवर त्या पोलिस अधिका-याचा काही सेंकदांचा व्हिडिओ आढळून आला.
 
 
यात तो पोलिस अधिकारी दिल्ली पोलिसदलातील असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्याच्या वर्दीवर नेम प्लेट नसल्याचे म्हटले आहे. व्हिडिओ बारकाईने पाहिला असता त्याच्या खांद्यावर दिल्ली पोलिसांचा बॅच दिसून येतो.
 
 
 
यावरुन हे स्पष्ट झाले की हा अधिकारी युपी पोलिस दलातील नाही तर दिल्ली पोलिस दलातील आहे. आता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे का हे तपासून पाहायचे होते त्यामुळे आम्ही दुस-या फोटोचा शोध घेतला असता आम्हाला ओमप्रकाश बिर्लांसोबत पोलिस अधिका-याच्या चेह-याशी साधर्म्य असणारी व्यक्ती दिसली.  आम्ही दोघांचे फोटो जुळवून पाहिले. असता आम्हाला दोघांच्या चेह-यात फार फरक जाणवला.
 
 
 
त्यामुळे आम्ही आरएसएसच्या गणवेशात असणारी व्यक्ती कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती राजस्थानमधील बुंदी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार अशोक डोगरा असल्याचे समोर आले.
 
 
 
आम्हाला अशोक डोगरा यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ देखील अमर उजाला वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर  आढळून आला. 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की टविटरवर  करण्यात आलेला दावा खोटा आहे.  तो पोलिस अधिकारी यूपीचा नाही शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य देखील नाही. संघाच्या गणवेशात आमदार अशोक डोगरा आहेत. व्हायरल फोटोतील पोलिस अधिकारी नाही. 
 
Tools Used 
 
  • Google Search
  • Twitter Advanced Search 
  • Facebook Search
 
Result- False 
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular