Claim–
उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्राच्या शुद्धी करता होम हवन केले.
Verification–
Shailen Pratap शैलेन्द्र नावाच्या ट्विटर हॅंडलवर योगी आदित्यनाथ यांचा होम हवन करतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रशुद्धीसाठी होम हवन केले.
आम्ही व्हायरल दाव्याचे सत्य पडताळून पाहण्याचे ठरविले. यासाठी गूगलमध्ये काही कीवर्ड्सचा आधार घेऊन शोध घेतला असता अशा प्रकारची कोणतीही बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही गूगल रिव्हर्स इमेज आणि याडेंक्स इमेजच्या मदतीने व्हायरल फोटोचा शोध घेतला असता आम्हाला याबाबतच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
याबाबत आम्हाला टाइम्स नाऊ या हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर बातमी आढळली ही बातमी एप्रिल महिन्यातील असून यात म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांनी रामनवमी दरम्यान अष्टमीच्या दिवशी विधीपूर्वक कन्यापूजन केले आणि होम हवनही केले. तसेच त्यांनी आपल्या हातांनी भोजन देखील वाढले.
इतर माध्यमांतही ही बातमी प्रसिद्ध झाली होती. यावरुन हेच स्पष्ट होते की एनआरसी आणि सीएए च्या चर्चा देशात चालू असताना योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रशुद्धीसाठी होम हवन केलेले नाही. त्यांच्या जुना फोटो खोट्या दाव्यानिशी व्हायरल करण्यात आला आहे.
Tools Used
Google Reverse Image Search
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)