Verification–
Madhupurnima kishwar यांनी आपल्या ट्विटर हॅंडल वर एक ट्विट शेअर केले आहे. यात लिहिले आहे कि राणू मंडलचे अयोध्येत चर्चसाठी जागेची मागणी करणारे विधान फारच निराशाजनक आहे. जेव्हा ती रेल्वे स्टेशनवर राहत होती त्यावेळी ख्रिस्ती मिशन-यांनी तिचा शोध का घेतला नाही. मधुपौर्णिमा यांनी प्रशांत आरएसएस नावाच्या व्यक्तीचे ट्विट शेयर केले आहे. या ट्विटमध्ये प्रशांत यांनी दावा केला आहे कि राणू ने चर्चसाठी जागेची मागणी केली आहे. आता ती लोकांच्या डोक्यावर बसायला लागली आहे.
आम्ही या ट्विटसंदर्भात पडताळणी सुरू केली असता हा मॅसेज सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. अशाच प्रकारचे एक ट्विट ही आढळून आले.
याशिवाय ही पोस्ट फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असल्याचे दिसून आले.
राणू मंडलच्या या वक्तव्यासंबंधी आम्ही गूगलमध्ये शोध घेतला पण राणूने अयोध्येत जागेची मागणी केल्याची एकही बातमी माध्यमांमध्ये आढळून आली नाही. पण या शोधादरम्यान अशाच दाव्याचे एक ट्विट आढळून आले मात्र यात एका बातमीची लिंक शेअर करण्यात आली होती. या बातमीत राणू मंडलने जागेची मागणी केली असल्याचे म्हटले आहे.
ट्विटमध्ये The Fauxy नावाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीची लिंक देण्यात आली आहे. या बातमीनुसार अयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक खुश आहेत पण काही लोक असंतुष्ट आहेत. ख्रिस्ती मिशन-यांनी रातोरात प्रसिद्धीस आलेली गायिका राणू मंडलला अयोध्येत चर्चसाठी जागेची मागणी करावी अशी विनंती केली आहे. यावर राणूने देखील म्हटले आहे की ख्रिस्ती लोकांना अयोध्येत जागा मिळाली पाहिजे काऱण त्यांना भव्य दिव्य चर्च बांधता येईल. सिद्धूने देखील गुरूद्वारासाठी जागेची मागणी करावी असे आवाहन तिने केला आहे.
पडताळणीदरम्यान समोर आले की ही वेबसाईट व्यंग्यात्मक बातम्या प्रकाशित करत असते. वेबसाईटवर देखील याची माहिती देण्यात आली आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की राणू मंडल हिने अशा प्रकारची कोणतीही मागणी केलेली नाही. एक व्यंग्यात्मक बातमी लोकांनी खरी मानली आणि तिच्या आधारे सोशल मिडियात संदेश व्हायरल केले।
Tools Used
- Google Keywords Search
- Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा che[email protected])