क्लेम–
लेह लडाख नगरपालिका निवडणुकीत भाजपचे खाते देखील उघडले नाही. सर्वच 13 जागांवर कांॅंग्रेसचे उमेदवार निवडून आले.
व्हेरिफिकेशन–
Deepak नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. यात दावा करण्यात आला आहे की लडाख आणि लेह मधील रहिवासी भाजपवर एवढे खुश आहेत की नगरपालिका निवडणुकीत सगळ्याच 13 जागांवर काॅंग्रेसचा विजय झाला.
आम्ही या ट्विटची पडताळणी सुरु केली असता असाच दावा करणारे आणखी एक ट्विट आढळून आले.
फेसबुकवर देखील असाच दावा करण्या-या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. आपण या पोस्ट खाली पाहू शकता.

लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित झाल्यानंतर तिथे नगरपालिका निवडणुका झाल्या होत्या की नाही याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हिंदीमध्ये काही किवर्ड्सच्या मदतीने गुगलमध्ये शोध घेतला असता अनेक बातम्यांचे परिणाम आढळून आले. पण यातील एकाही बातमीत नगरपालिका निवडणुकांचा उल्लेख नव्हता.

गुगलवर आणखी शोध घेतला असता आम्हाला हिंदी दैनिक नवभारत टाइम्स मध्ये एक वर्षापूर्वी छापून आलेली बातमी मिळाली. बातमीनुसार लेह नगरपालिकेत सगळ्याच जांगावर काॅंग्रेस विजयी झाली, भाजपा आपले खाते देखील उघडू शकली नाही.

हीच बातमी लाइव हिंदुस्तान नावाच्या वेबसाइटवर देखील होती.

यावरुन स्पष्ट होते की लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित होण्याआधीच मागील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली होती. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर जुनी बातमी सोशल मिडियात चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल करुन संभ्रम निर्माण केला जात आहे.
Tools Used
- Twitter Advanced Search
- Facebook Search
- Google Keywords Search
Result- Misleading
(जर आपणास आमच्या लेखात काही त्रुटी आढळून आली किंवा एखादा संदेश किंवा बातमीसदंर्भात संभ्रम वाटत असेल तर योग्य माहिती मिळवण्यासाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर मेल करु शकता)