Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeMarathiशहनवाज हुसैन नाहीत मुरली मनोहर जोशींचे जावई, व्हायरल झाला खोटा दावा

शहनवाज हुसैन नाहीत मुरली मनोहर जोशींचे जावई, व्हायरल झाला खोटा दावा

Authors

Claim

भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसैन हे हिंदु हृदय सम्राट मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत.  त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सगळ्या भक्तांना शुभेच्छा. 

Verification
रीना ठाकुर या ट्विटर हॅंडलवर भाजपाचे प्रवक्ते शहनवाज हुसैन यांच्याबद्दल एक ट्विट करण्यात आले आहे. यात दावा करण्यात आला आहे कि भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. हुसैन यांनी हिंदू कट्टरतेवर देखील मात करुन लग्न केले त्यामुळे भक्तांना हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
आम्ही व्हायरल होत असलेल्या दाव्यासंंबंधी पडताळणी करण्याचे ठरविले. यासंबंधी गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला शहनवाज हुसैन यांच्या प्रेमसंबंध आणि लग्नासंदर्भात माहिती देणारा एक व्हिडिओ यूट्यूब पर आढळून आला. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की हुसैन यांना आपले प्रेम मिळणवण्यासाठी नऊ वर्षे वाट पहावी लागली होती. ती मुलगी हिंदू होती मात्र नंतर दोघांचे लग्न झाले.
या व्हिडिओ हुसैन यांची पत्नी मुरली मनोहर जोशी यांची कन्या असल्याचा किंवा तिचे आईवडिल कोण आहेत याबाबत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे आम्ही पडताळणी सुरु ठेवली.
विकीपीडियात आम्हाला शहनवाज यांच्या पत्नी आणि मुलाबद्दल माहिती मिळाली.  या लेखात म्हटले आहे की त्यांचा पत्नीचे नाव रेणु शर्मा असून त्यांना अरबाज आणि अबीब ही दोन मुले आहेत. तसेच त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1968 रोजी झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय  गजबइन्फो या वेबसाईटवर हुसैन यांच्याविषयी माहिती देण्यात आली आहेत यात ही त्यांची  पत्नी रेणु शर्मा असल्याचे म्हटले आहे.
यावरुन लक्षात येते की मुरली मनोहर जोशी हे हुसैन यांचे सासरे नाहीत कारण हुसैन यांच्या सास-यांचे आडनाव हे शर्मा आहे. यानंतर आम्ही मनोहर जोशींच्या मुलीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असता आम्हाला एका वेबसाईटवर त्यांच्याविषयी माहिती मिळाली. मुरली मनोहर जोशी यांना निवेदिता आणि प्रियंवदा जोशी नावाच्या दोन मुली आहेत.
 यावरुन हेच स्पष्ट होते की मुरली मनोहर जोशी यांना रेणु या नावाची मुलगी नाही. तसेच शाहनवाज हुसैन हे जोशी यांचे जावई नाहीत. शिवाय त्यांच्या जन्मतारेखबद्दल आणि लग्नाबद्दल सोशल मीडियात याआधी देखील हा भ्रामक दावा व्हायरल झाला होता.
Tools Used 
Twitter Advanced Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular