Friday, September 30, 2022
Friday, September 30, 2022

घरMarathiसिलीगुडीत दरोडयाच्या प्रयत्नात तोडली मां कालीची मूर्ती, सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल

सिलीगुडीत दरोडयाच्या प्रयत्नात तोडली मां कालीची मूर्ती, सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल

Claim
सिलीगुडीतील गेट बाजार काली मंदिरातील माँ कालीची मूर्ती तोडण्यात आली. सेक्युलर यावर काहीही बोलणार नाहीत.
Verification
ट्विटरवर सध्या काही मूर्ती तोडल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोसंबधी दावा केला जात आहे की सिलीगुडीतील गेट बाजार काली मंदिरातील मां कालीची मूर्ती तोडण्यात आली मात्र यावर सेक्युलर गप्प आहेत. हे सत्य आहे का अशा प्रश्न देखील ट्विटरवर काही यूजर्सनी विचारला आहे.
आम्ही याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले असता आम्हाला फेसबुकवर देखील याबाबत अनेक दावे आढळून आले.
आम्ही काही कीवर्ड्सच्या आधारे याबाबत शोध घेतला असता आम्हाला siliguritimes.com या वेबसाईटवर याबाबतची बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी सिलीगुडीतील गेटबाजार येथील शिवशक्ती काली मंदिरात काही दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या आत ठेवलेली मूर्तीही तुटली होती.
याशिवाय आम्हाला दैनिक जागरण या हिंदी वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी देखील मिळाली. यात म्हटले आहे की मंदिरात चोरी होण्याची ही आठवी वेळ आहे. पोलिसांनी याच परिसरातील पाच लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की सिलीगुडीमधी मां काली मंदिरात चोरीच्या उद्देशाने मूर्तीची तोडफोड़ करण्यात आली. धार्मिक भावना भडकावण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या दाव्यांमध्ये तथ्य नाही.
Sources 
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Yash Kshirsagar
Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular