After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim– बंधुनों सावध रहा, जिथे जिथे आंदोलन होत आहे तिथे आरएसएसवाले आपल्या लोकाना मुस्लिम महिलांमध्ये बुरखे घालून पाठवत आहेत.
Verifcation–
सोशल मीडियात बुरखा घातलेला एका पुरुषाला काही लोक चोप देत असल्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओविषयी दावा केला जात आहे की आरएसएस चे लोक जिथे कुठे आंदोलन सुरु असेल तिथे मुस्लिम महिलांच्या बुरखाधारी पेहरावात घुसत आहेत.
आम्ही व्हायरल व्हिडिओबाबत पडताळणी करण्याचे ठरविले यासाठी काही किवर्डच्या साहाय्याने शोध सुुुरु केला. असता आम्हाला फेसबुक वर हा व्हिडिओ याच दाव्याने व्हायरल होत असल्याचे आढळून आले.
ट्विटरवर देखील याच दाव्याचे ट्विट आढळून आले.
तसेच युट्यूब वर देखील हाच दावा असलेला व्हिडिओ एका चॅनलवर आढळून आला.
आम्ही यासंदर्भात माध्यमांत काही बातमी मिळतेय का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला कुठेही आंदोलनात आरएसएसने बुरखाधारी पुरुष घुसविले असल्याची बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतून काही स्क्रीनशाॅट्स काढले आणि रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता युट्यूब वर मागील वर्षी अपलोड करण्यात आलेला हाच व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की बुरखा घातलेल्या पुरुषाने गोव्यातील पणजी बस स्थानकात तणाव निर्माण केला.
आम्ही याबाबत शोध सुरुच ठेवला असता
एएनआयची एक बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की, पणजी बसस्थानकातील महिला स्वच्छतागृहात एक 35 वर्षीय बास्को फर्नाडिंस नावाचा पुरुष बुरखा घालून घुसला होता लोकांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
याशिवाय
न्यूज 18 च्या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ हा रॅलीत मुस्लिम महिलांचा बुरखा घालून घुसलेल्या आरएसएस कार्यकर्त्याचा नसून मागील वर्षी पणजी बस स्थानकात बुरखा घालुन लेडीज टाॅयलेटमध्ये घुसलेल्या पुरुषाचा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Sources
Facebook Search
Twitter Advanced Search
Youtube Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.