Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeMarathiआरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस संबंधी 'आपत्कालीन सूचना' जारी केली नाही, व्हायरल झाला खोटा दावा

आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस संबंधी ‘आपत्कालीन सूचना’ जारी केली नाही, व्हायरल झाला खोटा दावा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim–  आरोग्य मंत्रालयाने कोरोनाव्हायरससंबंधी ‘आपत्कालीन सूचना’ जारी केली आहे.

Verification
चीनमध्ये कोरोना व्हायरस ने धुमाकुळ घातला असतानाचा सोशल मीडियामध्ये काही या व्हायरससंदर्भात अनेक पोस्ट शेअर होत आहेत. भारतात देखील याबाबत अनेक दावे शेअर होत आहेत. आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस संदर्भात काय काय काळजी घ्यावयाची याची सूचना दिल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्हाला ही पोस्ट आमच्या एका वाचकाने व्हाट्सएप्प वर पाठवली आणि याची शहानिशा करण्यास सांगितले आम्ही ही पोस्टमध्ये काय म्हटले आहे याचा मराठी अनुवाद केला आहे तो खालील प्रमाणे-
 खूप गंभीर, महत्वाची माहिती-

आरोग्य मंत्रालयाने जनतेला आपत्कालीन सूचना जनतेला दिली आहे. कोरोनाव्हायरस इन्फ्लूएंझाचा उद्रेक होणे अत्यंत गंभीर आणि जीवघेणे आहे. एकदा आपल्याला संसर्ग झाल्यावर उपचार नाही.
या व्हायरसचा चीनमधून अन्य देशांत प्रसार होत आहे. 

 यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे आपला घसा ओलावा राहू द्या, आपला घसा कोरडा होऊ देऊ नका. म्हणून आपली तहान भागवू नका कारण एकदा आपल्या घशातील पडदा वाळल्यानंतर, विषाणू आपल्या शरीरात 10 मिनिटांत आक्रमण करेल. वयानुसार मुलांसाठी 50-80 सीसी कोमट पाणी, 30-50 सीसी प्या. प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला वाटते की आपला घसा कोरडा आहे, थांबू नका, पाणी हातात ठेवा.  एकाच वेळी भरपूर प्रमाणात पिऊ नका, त्याऐवजी घसा ओलसर ठेवा.
मार्च 2020 अखेरपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, विशेषत: ट्रेन किंवा सार्वजनिक ठिकाणी तळलेले किंवा मसालेदार अन्न टाळा आणि व्हिटॅमिन सी घ्या.


अशी आहेत लक्षणे
1. वारंवार ताप येणे
२. तापानंतर दीर्घकाळ खोकला येणे
3. मुलांना धोका आहे.
A. वयस्कांना सहसा अस्वस्थता, * डोकेदुखी आणि मुख्यत: श्वसनाशी अस्वस्थता
5: अत्यंत संक्रामक
आपण मानवी जीवनाची काळजी घेत असल्यास कृपया हा संदेश सामायिक करा
 
फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल होत आहे
आरोग्य  मंत्रालयाने  खरंच भारतातील लोकांसाठी असा काही सल्ला दिला आहे का याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला याबात आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर एक चीनला जाणा-या प्रवाशांसाठी  कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंबंधी आणि काळजी घेण्यासंबंधी ट्रॅव्हल अडवायजरीची एक पीडीएफ फाईल आढळून आली. 25 जानेवारी, 2020 रोजी चीनमध्ये मृत्यूची संख्या वाढल्यानंतर आणि इतर अनेक देशांमध्ये हा आजार पसरल्यानंतर ही अॅडवायजरी अपडेट करण्यात आली. मंत्रालयाने ताप, वाहते नाक, सतत खोकला आणि सर्दी अशी चिन्हे किंवा लक्षणे आढळलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक अतिरिक्त हेल्पलाईन (011-23978046) देखील सुरू केली.तसेच वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क घालणे आणि आजारी असलेल्या लोकांशी संपर्क साधणे टाळणे यासारख्या प्रतिबंधक आणि खबरदरीचे उपाय देखील सांगितले आहे. मात्र या  घशाशी संबंधित काळजी घेण्याचा किंवा गर्दीच्या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत न जाण्याचे आवाहन केलेले नाही.
आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर देखील ही माहिती दिली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की आरोग्यमंत्रालयाच्या नावाने सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेला मॅसेज खोटा आहे. त्यातील सूचनांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. कोरोना व्हायरसबदद्ल सध्या अनेक अफवा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. हा मॅसेज सुद्धा एक अफवाच असल्याचे आमच्या पडताळणीत समोर आले आहे.
Sources
Google Search
Facebook Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular