Claim– कोबे ब्रायंटच्या हेलिकाॅप्टरच्या व्हिडिओ, तुम्हाला हा अपघात वाटतो ?
Verification–
सुप्रसिद्ध फुटबाॅलपटू कोबे ब्रायंट याचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हेलिकाॅप्टर अपघातात मृत्यू झाला. सोशल मीडियात सध्या एक हेलिकाॅप्टर क्रॅश झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून दावा केला जात आहे कि हा व्हिडिओ ब्रांयटच्या हेलिकाॅप्टर अपघाताचा आहे. तर काहींनी हा घातपात असण्याची शंका व्यक्त केली आहे.
याशिवाय ट्विटरवर देखील आणखी एक व्हिडिओ आढळून आला
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्ड्सचा वापर केला असता आम्हाला कोबे ब्रायंटच्या अपघातात मृत्यूची बातमी
बिझनेस इनसायडर च्या वेबसाईटवर आढळून आली मात्र आम्ही या बातमीमध्ये व्हायरल व्हिडिओतील स्क्रीनशाॅट किंवा इमेज आढळून आली नाही.
याशिवाय आणखी बातम्या आढळून आल्या मात्र यात व्हायरल व्हिडिओ अथवा फोटो नव्हता
यानंतर आम्ही रिव्हर्स इमेजच्या मदतीने हा व्हिडिओतील काही स्क्रिनशाॅटचा शोध घेतला असता आम्हाला एका यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ डिसेंबर 2018 मध्ये अपलोड करण्यात आला आहे.
याशिवाय आम्हाला
गल्फ न्यूजच्या वेबसाईटवरील बातमीत देखील हा व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की, सौदी अरब मधील रास अल खैमाह मध्य़े राष्ट्रीय शोध आणि बचाव केंद्राने शनिवारी जैस माउंटनजवळ दुर्घटनाग्रस्त झालेल्या आॅगस्टा 139 हेलिकॉप्टरमध्ये आपले कर्तव्य बजावताना ठार झालेल्या चार कर्मचार्यांची नावे जाहीर केली.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ हा कोबेच्या हेलिकाॅप्टर अपघाताचा नाही, तर गेल्यावर्षी यूएईमध्ये झालेल्या हेलिकाॅप्टर अपघाताचा आहे. कोबे ब्रायंटच्या हेलिकाॅप्टरचा कॅलिफोर्नियत अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी धुके होते तर व्हायरल व्हिडिओ मध्ये लख्ख ऊन आणि उजाड पर्वत दिसत आहेत.
Sources
Twitter Advanced Search
Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)