Claim–
एकीकडे रेल्वेचे प्लॅटफाॅर्म तिकीट दहा रुपयांत भेटते तर दुसरीकडे जवाहरलाल नेहरु विद्यापीठात होस्टेलमध्ये मुलांना अशी आलिशान रुम प्रति महिना 10 रुपये भाड्याने मिळते.

Verifcation–
सध्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटामंधील गोंधळामुळे तणावाची स्थिति निर्माण झाली होती. अशातच सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे यात म्हटले आहे की प्लॅटफाॅर्म तिकिट हे दोन तासांसाठी दिले जाते त्यासाठी 10 रुपए आकारले जातात. तर दुसरीकड़े जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी 10 रुपयांत आलिशान खोली मिळते. आमच्या एका वाचकाने या पोस्टमध्ये शेअर होत असलेला फोटो पडताळणीसाठी आमच्याकडे पाठवला.
यानुसार आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली असता एक नोव्हेंबर 2019 मधील एक ट्विट आढळून आले. यात हाच दावा करण्यात आला होता.
असेच आणखी एक ट्विट आढळून आले.
आम्ही या संदर्भात व्हायरल होत असलेल्या फोटोचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा फोटो क्राॅप केला आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधला. असता आम्हाला हा फोटो विद्यार्थ्यांसाठी पेईंग गेस्ट तत्वावर राहण्यासाठी रुम उपलब्ध करणा-या
वेबसाईटवर अपलोड केल्याचे आढळूनआला.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही रुम दिल्लीतील शक्तीनगरमध्ये उपलब्ध आहेत.
यावरुन हे स्पष्ट होते की व्हायरल पोस्टमधील फोटो हा जेएनयूमधील नसून दिल्लीतील एका पेईंग गेस्ट होस्टेलचा आहे. हा फोटो चुकीच्या दाव्याने सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Tools Used
Google Reverse Image
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)