Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiदिल्लीतील साकेत कोर्टात पोलिस कर्मचा-याला मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल

दिल्लीतील साकेत कोर्टात पोलिस कर्मचा-याला मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात पोलिस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली। जर पोलिसांसोबत असा व्यवहार होत असले तर देवच आम्हाला वाचवेल.

Verification- 
Zainb Sikander नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत काही वकिल एक मोटारसायकलस्वार पोलिस कर्मचा-याला थांबवून मारहाण करतान दिसत आहेत. त्यांच्या मारहाणीतून सुटून हा कर्मचारी तेथून जाताना दिसत आहे. हे दृश्य दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरातील असल्याचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे कि पोलसांसोबत अशा प्रकारचा व्यवहार दुर्दवाचा आहे.
दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात पोलिस आणि वकिल यांच्यात मारामारी झाली होती का याबाबत आम्ही गूगल वर शोध घेतला असता याबाबतच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
गूगलवर शोध सुरु केला असता आम्हाला एनडीटिव्हीच्या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली. या बातमीत तीस हजारी कोर्टात पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे सीसीटिव्ही फुटेज अपलोड करण्यात आले आहेत. यात कुठेही व्हायरल व्हिडिओ आढळून आला नाही.
तसेच टीव्ही9 भारतवर्षच्या बातमीचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आढळून आला. तीस हजारी कोर्टात पार्किंगवरुन पोलिस आणि वकीलांमध्ये हिंसक बाचाबाची झाली असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
यावरुन हे स्पष्ट झाले की ट्विटर वर व्हायरल करण्यात आलेला व्हिडिए हा तीस हजारी कोर्च परिसरातील नाही. आम्ही हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची पडताळणी सुरू केली. यासाठी आम्ही गुगल रिवर्स इमेजच्या मदतीने शोध घेतला पण यातून काही हाती लागले नाही. त्यानंतर काही किवर्ड्सचा वापर केला असता आम्हाला हा व्हिडिओ इन खबर या युट्यूब चॅनेलवर आढळून आला.
इन खबरच्या बातमीनुसार हा व्हिडिओ दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरातील आहे. दिल्लीतील तीस हजारी प्रकरणानंतर इतर कोर्टांच्या परिसरातही वकिलांकडून पोलिसांना अशी वर्तवणुक दिली जात असल्याचे म्हटले आहे. या शिवाय आम्हाला नवभारत टाइम्सच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडिओ आढळून आलाय यात देखील हा व्हिडिओ साकेत कोर्ट परिसरातील असल्याचे म्हटले आहे.
यावरुन स्पष्ट झाले की ट्विटर पर जो व्हिडिओ तीस हजारी कोर्टाचा म्हणून शेअर करण्यात आला होता तो साकेत कोर्ट परिसरातील आहे. सोशल मिडियात भ्रामक दाव्यानिशी तो शेअर करण्यात आला आहे.
Tools Used 
  • Twitter Advanced Search
  • Google Keywords Search
  • Youtube Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular