Claim–
नागा साधुंनी CAA आणि NRC च्या समर्थनार्थ हरिद्वारमध्ये भव्य रॅली काढली.
Verification–
Sandeep Dhar नावाच्या ट्विटर हॅंडलवर नागा साधुंचा एक व्हिडिओ शेअर कऱण्यात आला आहे. यात मोठ्या संख्येने नागा साधून एकत्र रॅली काढत असल्याचे दिसत आहेत. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की CAA आणि NRC च्या समर्थनार्थ हरिद्वारमध्ये नागा साधुंनी भव्य रॅली काढली. पण या ट्विटमध्ये ही रॅली कधी काढली आणि किती साधू उपस्थित होते हे मात्र सांगितलेले नाही. त्यामुळे या आम्ही याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान हाच दावा असणारी एक पोस्ट फेसबुक वर आढळून आली. यात आपण नागा साधुंची ही रॅली पाहू शकता.
मात्र या पोस्टमध्ये देखील अर्धीच माहिती असल्याने आम्ही शोध सुरूच ठेवला. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या मदतीने शोध घेतला पण नागा साधुंनी हरिद्वारमध्ये रॅली काढल्याची बातमी आढळली नाही. यांनंतर आम्ही व्हायरल व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजेसच्या आधारे शोध सुरु ठेवला असता हा व्हिडिओ 2 जानेवारी रोजी युट्यूब वर अपलोड केल्याचे आढळून आले.
मात्र या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नागा साधुंची रॅली एवढाच उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट होऊ शकत नव्हते. आम्ही हेच स्क्रिनशाॅट्स यांडेक्सच्या मदतीने शोधले असता याचे अनेक व्हिडिओ आढळून आले.
शोध सुरु असताना आम्हाला एक हिंदी व्हिडिओ युटयूब चॅनलवर मिळाला ज्यात म्हटले आहे प्रयागराज येथील 2019 च्या कुंभमेळ्यातील महाकाल दरम्यानच्या साधुंच्या गर्दीचे दृश्य आहे.
तसेच आणखी एक व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की हा कुंभमेळ्याच्या समारोपाचा व्हिडिओ आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की ट्विटरवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ नागा साधुंच्या सीएएस समर्थनार्थ निघालेल्या रॅलीचा नाही. नागा साधुंनी अशी कोणतीही रॅली काढलेली नाही. हा व्हिडिओ मागील वर्षी प्रयागराजमध्ये संपन्न झालेल्या कुंभमेळ्यातील साधुंच्या गर्दीचा आहे. सोशल मीडियात खोट्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.
Tools Used
Invid
Reverse image search
Youtube
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)