Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiपन्नास वर्षांनतर उमलेलेले नाही हे औंदुबराचे फूल, सोशल मिडियात व्हायरल झाला खोटा...

पन्नास वर्षांनतर उमलेलेले नाही हे औंदुबराचे फूल, सोशल मिडियात व्हायरल झाला खोटा दावा 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

औंदुबराचे फुल कधी कूणास दिसत नाही.दर्शनाचा लाभ घ्यावा! ५० वर्षामध्ये एकदाच फूलणारे, निसर्गाची अगाध लीला. 

Verification– 
 
फेसबुकवर रविंद्र गुर्जर नावाच्या यूजर ने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका झाडाच्या खोडाला फूल लागल्याचे दिसून येत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या औदुंबराची (उंबराची) दुर्मिळ फुले पाठविली आहेत. दर्शनाचा लाभ घ्यावा! कृपया झूम करून पाहवी. औंदुबराचे फुल कधी कूणास दिसत नाही.दर्शनाचा लाभ घ्यावा!!!५० वर्षामध्ये एकदाच फूलणारे “ॐ कार पुष्प ” निसर्गाची अगाध लीला !!
  
आम्ही या बाबत शोध घेतला असता या फूलाबद्दलच्या अनेक पोस्ट वेगवेगळ्यो सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आल्या. 
 
फुलाचा व्हायरल होत असलेला फोटो पाहून आम्ही हेच उंबराचे फूल आहे का याबाबत माहिती जाणून घेण्याचे ठरविले. यासाठी गूगलमध्ये उंबर किंवा औंदुबर या किवर्ड्सआधारे शोध सुरु केला असता आम्हाला वीकिपीडियात उंबराबद्दल माहिती देणारा लेख सापडला.  या लेखात म्हटले आहे की उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. याचाच अर्थ असा की झाडाला वेगळे असे फूल येत नाही. आम्ही ऊंबराच्या फुल कसे तयार होत याबाबतचा एक लेख दैनिक सामनाच्या वेबसाईटवर आढळून आला. 
 
यानंतर आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या ऊंबराच्या फुलाच्या फोटो गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्स इमेजच्या सहाय्याने तपासून पाहिला असता आम्हाला तीन वर्षापूर्वीच्या काही बातम्या आढळून आल्या.  दैनिक लोकसत्ताच्या वेबसाईटवर आॅक्टोबर 2016 मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मिळाली. या बातमीत म्हटले आहे की मिरजमध्ये उंबराच्या झाडाला फुल लागल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली, तिथे पूजा देखील करण्यात आली मात्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ती बुरशी असल्याचे सांगितल्यावर लोकांमध्ये खळबळ उडाली. 
 
याबाबत दैनिक लोकमतने देखील वृत्त दिले होते यात म्हटले होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकांना हे फूल नसून बुरशी आहे हे सांगितल्यानंतरही अनेक महिला दर्शनासाठी येत होत्या. हा वाद पोलिसांत देखील गेला. 
 
यावरुन हेच स्पष्ट होते की फोटोत दिसते तसे उंबराचे फूल नसते. शिवाय पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. तसेच ही घटना तीन वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे सोशल मीडियात करण्यात येत असलेला दावा हा भ्रामक आहे. 
 
Tools Used 
 
Facebook Search 
Google Search 
 
Result- False
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

1 COMMENT

Most Popular