Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeMarathiपाकिस्तानच्या गजनवी मिसाईलचे तेरावे परीक्षण देखील फेल झाले ? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

पाकिस्तानच्या गजनवी मिसाईलचे तेरावे परीक्षण देखील फेल झाले ? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

पाकिस्तानच्या गजनवी मिसाईलची 13 वी टेस्ट देखील फेल झाली, हे 300 किलोमीटरपर्यंत मारा करणारे मिसाईल 36 किलोमीटर अंतरावरच कोसळले.

Verification
सध्या सोशल मीडियामध्ये एक मिसाईल कोसळल्याचा व्हिडिओ शेअर होत आहे. या व्हिडिओसंबंधी दावा करण्यात येत आहे की पाकिस्तानचे गजनवी मिसाईलची 13 वी टेस्ट देखील फेल झाली. 300 किलोमीटर पर्यंत मारा करणारे हे मिसाईल 36 किलोमीटरवरच कोसळले. हे लोक ( पाकिस्तान) लाहोर शहर स्वत : उडवतील आणि मोदीजींचे नाव घेतील.
याशिवाय फेसबुक वर देखील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आम्ही याबाबत गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला गजनवी मिसाईलच्या काही बातम्या दिसून आल्या.
आम्हाला जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर 23 जानेवारी 2020 रोजी प्रकाशित झालेली बातमी मिळाली, या बातमी नुसार पाकिस्तानने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे गजनवी मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले. हे मिसाईल 290 किलोमीटरवरील लक्ष्यावर निशाना साधू शकते.
याशिवाय पाकिस्तानी टिव्ही चॅनल समा टिव्हीच्या बातमीचा व्हिडिओ देखील आढळून आला.
यावरुन हेच सिद्ध होते की हा पाकिस्तानने गजनवी मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. मात्र सोशल मीडियात जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो नेमका कुठला आहे याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला तो व्हिडिओ रशियातील सात वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळून आले. याबाबत space.com या वेबसाईटवर बातमी आढळून आली.
अधिक शोध घेतला असता आम्हाला euronews या यूट्यूब चॅनलवर हा रशियन मिसाईल कोसळल्याचा व्हिडिओ आढळून आला.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पाकिस्तानच्या गजनवी मिसाईलचा नसून सात वर्षापूर्वी कोसळलेल्या रशियन मिसाईलचा आहे. सोशल मीडियात खोटा दावा करुन भ्रामकता पसरवली जात आहे.
Sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Reverse Image
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular